शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

नागपुरात बड्या हॉटेलमालकाने केला तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:50 AM

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुलीच्या वयाच्या तरुणीला दोन वर्षे एका डुप्लेक्समध्ये ठेवून तिच्यासोबत पत्नीसारखे संबंध ठेवणाºया आणि आता तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करणाºया एका बड्या हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.एलविन गोम्स जोये डी गोम्स (वय ५१) असे आरोपीचे नाव आहे. शंकरनगर चौक ते अंबाझरी मार्गावर गोम्सचे एक आलिशान ...

ठळक मुद्देदोन वर्षे पत्नीसारखे डुप्लेक्समध्ये ठेवलेलग्नास नकार देताच तरुणीने घेतला पोलिसांचा आधार

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुलीच्या वयाच्या तरुणीला दोन वर्षे एका डुप्लेक्समध्ये ठेवून तिच्यासोबत पत्नीसारखे संबंध ठेवणाºया आणि आता तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करणाºया एका बड्या हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.एलविन गोम्स जोये डी गोम्स (वय ५१) असे आरोपीचे नाव आहे. शंकरनगर चौक ते अंबाझरी मार्गावर गोम्सचे एक आलिशान हॉटेल आहे. तो हिंगणा मार्गावर राहतो. पीडित तरुणी (वय २५) या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट होती. गोम्स तिच्यावर भाळला होता. त्याने आधी तिला तीन वर्षांपूर्वी प्रपोज केले. तो वडिलांच्या वयाचा असल्यामुळे तिने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे गोम्सने त्यावेळी तिला चांगले मित्र बनू असे म्हणत तिच्यासोबत मैत्री जोडली. हॉटेलशी संबंधित कामाच्या निमित्ताने तिच्यावर वेगवेगळ्या जबाबदाºया सोपवून तो तिला इकडेतिकडे नेऊ लागला. ती उत्तर नागपुरात राहते, तिला येण्या-जाण्यासाठी पायपीट करावी लागते म्हणून तो स्वत:च आलिशान कारमधून तिला घेऊन यायचा आणि नेऊन सोडायचा. अशाप्रकारे तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने एमआयडीसीतील राजीव गांधीनगरातील राधाकृष्णनगरीत एक डुप्लेक्स घेतला. मी तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणत त्याने तिला तेथे ठेवले. जानेवारी २०१५ मध्ये तिच्यासोबत पहिल्यांदा शरीरसंबंध जोडले. तेव्हापासून आॅगस्ट २०१७ पर्यंत तो तिचा पत्नीसारखा उपभोग घेऊ लागला.---हाकलून लावण्याचा प्रयत्नतीन महिन्यांपासून तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला असता, त्याने तिला लग्नास नकार दिला. एवढेच नव्हे तर तिला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले आणि हाकलूनही लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गोम्सविरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.---

टॅग्स :Rapeबलात्कार