लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष दंगा नियंत्रण पथक म्हणून देशभरात सुपरिचित असलेल्या रॅपिड अॅक्शन फोर्सची १०७ वी तुकडी सोमवारी नागपुरात दाखल झाली. येथील संवेदनशील वस्त्या आणि विशेष ठिकाणांना भेटी देऊन ही तुकडी सामाजिक वातावरण दूषित करण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात, त्याचा अभ्यास करणार आहे.राजकीय किंवा जातीयवादातून तसेच अन्य कोणत्याही कारणावरून निर्माण झालेल्या दंगली नियंत्रित करण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स देशभरात ओळखली जाते. देशातील विविध भागात या फोर्सच्या १५ बटालियन कार्यरत आहेत. नागपूर हे देशाचे हृदयस्थळ असून, येथील राजकीय स्थिती तसेच सामाजिक समतेचा अभ्यास करण्यासाठी फोर्सची १०७ वी तुकडी उपकमांडंट रवी मिश्रा यांच्या नेतृत्वात नागपुरात सोमवारी दाखल झाली. २ ते ८ जुलैपर्यंत ही तुकडी आणि त्यातील जवान नागपुरातील राजकीय, सामाजिक संवेनशीलतेचा अभ्यास करणार आहे. कोणत्या कारणामुळे दंगा होतो, त्याचीही पार्श्वभूमी जाणून घेत एक माहितीपट तयार करणार आहे. सोबतच देशात झालेल्या राजकीय आणि जातीय दंग्याचीही माहिती पोलिसांना देऊन दंगे टाळण्यासाठी आणि हाताळण्यासाठी काय करायचे, त्याची माहिती देणार आहे. ही तुकडी सोमवारपासून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी नागपुरात सक्रिय झाली. विविध पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्या भागातील परिस्थिती जाणून घेतली आहे. बुधवारी या पथकाने गिट्टीखदान भागात पथसंचलन केले.--
रॅपिड अॅक्शन फोर्स नागपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:38 AM
विशेष दंगा नियंत्रण पथक म्हणून देशभरात सुपरिचित असलेल्या रॅपिड अॅक्शन फोर्सची १०७ वी तुकडी सोमवारी नागपुरात दाखल झाली. येथील संवेदनशील वस्त्या आणि विशेष ठिकाणांना भेटी देऊन ही तुकडी सामाजिक वातावरण दूषित करण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात, त्याचा अभ्यास करणार आहे.
ठळक मुद्दे१०७ वी तुकडी : उपराजधानीतील सामाजिक स्थितीचा करणार अभ्यास