शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रामबाग कॉलनीत आढळले दुर्मिळ रक्तलोचन घुबड 

By आनंद डेकाटे | Published: July 21, 2023 5:26 PM

घुबडाचे नख खुप मोठे असल्याने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून अत्यावश्यक उपचारासाठी वनविभागाकडे सोपवले.

नागपूर : रामबाग कॉलनी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी परिसरात शुक्रवारी दुर्मिळ रक्तलोचन घुबड सापडले. त्याची प्रकृती बरी नव्हती. अशा अवस्थेत घुबड सापडल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते.

रामबाग परिसरात डी.एस रॉयल इनफिल्ड सर्विस सेंटरचे इमरान शेख यांना झुडपी परिसरातील आकाशात कावळे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. ते जमिनीच्या दिशेने येऊन काव-काव करीत होते. इमरान यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक मोठे जंगली घुबड आढळून आले. लोकांनी गर्दी केली. सर्पमित्र अललेले आशीष मेंढे, पियुष पुरी व मयुर कुरटकर यांना याबाबतची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हे घुबड आजारी असल्याचे लक्षात आले. घुबडाचे नख खुप मोठे असल्याने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून अत्यावश्यक उपचारासाठी वनविभागाकडे सोपवले.

माजी पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बोधाने यांनी या घुबडाविषयी माहिती देताना सांगितले की, हे घुबड दुर्मिळ जातीत मोडणारे "mottled wood owl" (रक्तलोचन घुबड) आहे. या घुबडाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार शेड्युल - १ अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे.

रक्तलोचन घुबड ओळखण्याची खूण म्हणजे याच्या वरील बाजूस पांढरे व तांबूस चट्टे असतात.तर खालील बाजू पांढुरकी असून त्यावर गडद तपकिरी रेषा तसेच लालसर-तपकिरी चट्टे व पट्टे असतात. फिक्कट चपट्या चेहऱ्यावर काळ्या वर्तुळाकार रेषा व डोळे गडद असतात. या घुबडाचे मुख्य खाद्य खारी, छोटे सरपटणारे प्राणी, उंदीर, सरडे, खेकडे, कीटक आहेत. हा पक्षी निशाचर असून झुडपी तसेच जंगल क्षेत्रात वास्तव्याला असतो.

टॅग्स :wildlifeवन्यजीवnagpurनागपूर