शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

रतन टाटा येणार संघस्थानी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:57 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. मागील वर्षी समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देतृतीय वर्ष वर्ग समारोपाला मुख्य अतिथी राहण्याची शक्यता : सरसंघचालकांचीदेखील राहणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. मागील वर्षी समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली होती.तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यंदा नागपुरात २३ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून ८२८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर १६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा यांच्यापर्यंत आमंत्रण पोहोचलेदेखील असून त्यांची अधिकृत स्वीकृती यायची आहे. येत्या आठवड्यात निश्चिती येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला मंचावर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील उपस्थिती राहणार असून ते स्वयंसेवकांना उद्बोधन करतील.एप्रिलमध्येच घेतली होती सरसंघचालकांची भेटमागील काही काळ उद्योगपती रतन टाटा यांनी अनेकदा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. १८ एप्रिल रोजी त्यांनी नागपुरात येऊन संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट संघाकडून गुप्त ठेवण्यात आली होती. याअगोदर २८ डिसेंबर २०१६ रोजी टाटा यांनी अचानकपणे संघ मुख्यालयाला भेट दिली होती. शिवाय मुंबईतदेखील एका कार्यक्रमात रतन टाटा हे सरसंघचालकांसमवेत एकाच मंचावर उपस्थित होते.तृतीय वर्ष वर्ग असतो ‘खास’संघाच्या प्रणालीत तृतीय वर्ष वर्गाचे महत्त्वाचे स्थान असते. दरवर्षी रेशीमबागला होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला देशविदेशातील मान्यवरांची उपस्थिती असते. मागील वर्षी प्रणव मुखर्जी यांच्या येण्याने संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरकडे लागले होते. २०१७ साली नेपाळचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल रुक्मांगुद कटवाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याअगोदर कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ.वीरेंद्र हेगडे, सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहे.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय