शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

रेतीमाफिया कृष्णा यादवला ‘एमपीडीए’अंतर्गत अटक

By admin | Published: January 18, 2017 2:41 AM

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत रेतीमाफिया कृष्णा ऊर्फ किसना रामनाथ यादव

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मध्यवर्ती कारागृहात रवानगी नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत रेतीमाफिया कृष्णा ऊर्फ किसना रामनाथ यादव (२६, रा. वॉर्ड क्रमांक - ३, चनकापूर, ता. सावनेर) यास ‘एमपीडीए’ (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांवर प्रतिबंध करणारा कायदा-१९८१)अंतर्गत अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली असून, त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. कृष्णा यादव हा खापरखेडा परिसरात ‘छोटा लतिफ’ नावानेही ओळखला जातो. त्याच्याविरोधात खापरखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध दारू विक्री करणे, शस्त्र बाळगणे तसेच रेतीची चोरी करणे अशा प्रकरच्या २६ गंभीर गुन्ह्यांनी नोंद आहे. त्याच्यावर रेतीचोरीचे सात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याने खापरखेडा परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यास तो धमकावत असत. त्याच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी खापरखेडा पोलिसांनी त्याच्याविरोधात ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून जिल्हा दंडाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे सादर केला होता. त्यावर जिल्हादंडाधिकारी कुर्वे यांनी कृष्णा यादवला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश १३ डिसेंबर २०१६ रोजी निर्गमित केला होता. याची कुणकुण लागल्याने तो फरार झाला होता. त्यामुळे खापरखेडा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यातच तो मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागला. त्याला लगेच अटक करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिसांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)