लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने याचिका खारीज केल्यानंतर आता रेशन दुकानदारांनी राष्ट्रपतींकडे साकडे घातले आहे. रेशन वितरण प्रणालीतील बायोमेट्रिक मशीनवरील थम्ब घेण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात जवळपास एक हजारावर दुकानदार पॉझिटिव्ह आढळले असून, काहींचा मृत्यूही झाला आहे.कोरोनाच्या निर्मूलनासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) ने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन रेशन दुकानात होताना दिसत नाही. त्यामुळे रेशन दुकानांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण वाढत असून, रेशन दुकानदारांसह कार्डधारकही बाधित होत आहेत. सरकारने रेशनचे वितरण बायोमेट्रिकद्वारे करण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कार्डधारकांना बायोमेट्रिकवर थम्ब लावल्यानंतरच धान्य उपलब्ध होत आहे. हा थम्ब कोरोना संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. कोरोना आहे तोपर्यंत ही प्रक्रियाच रद्द व्हावी, अशी मागणी रेशन दुकानदारांची आहे. यासंदर्भात नागपूर रेशन दुकानदार संघातर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रेशन दुकानदारांची मागणी लक्षात घेता, न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली होती. राज्य सरकारने उत्तर देताना हा निर्णय केंद्र सरकारचा असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने रेशन दुकानदारांची याचिका खारीज केली.रेशन दुकान हे कोरोना संक्रमणासाठी हॉटस्पॉट ठरत असल्यामुळे रेशन वितरणातील बायोमेट्रिक थम्ब प्रक्रिया बंद करण्यात यावी, अशी मागणी नागपूर रेशन दुकानदार संघाने राष्ट्रपतींसह पंतप्रधान, राज्यपाल, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री, आयसीएमआरचे अध्यक्ष यांना केली आहे.
रेशन दुकानदारांचे आता राष्ट्रपतींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 8:53 PM
Ration, Shopkeepers, President, epos Machine, Nagpur News उच्च न्यायालयाने याचिका खारीज केल्यानंतर आता रेशन दुकानदारांनी राष्ट्रपतींकडे साकडे घातले आहे. रेशन वितरण प्रणालीतील बायोमेट्रिक मशीनवरील थम्ब घेण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात जवळपास एक हजारावर दुकानदार पॉझिटिव्ह आढळले असून, काहींचा मृत्यूही झाला आहे.
ठळक मुद्देबायोमेट्रिक मशीनवरील थम्ब बंद करण्याची मागणी