लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागात श्रीरामाच्या गजरात रावण दहन करण्यात आले.सनातन धर्म युवक सभेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित ६७ व्या दसरा महोत्सवात रावण, कुंभकर्ण व मेघनादच्या पुतळ्यांचे पूजन करून त्यांचे दहन करण्यात आले. फटाका शो झाला. राजाबाक्षा मंदिर मैदानातही रावण दहन करण्यात आले.पूर्व समर्थनगरयशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग १६ तर्फे विजयादशमीच्या निमित्ताने मनपा प्रांगण, पूर्व समर्थनगर, जुनी अजनी येथे रावण दहन व रामलीला आयोजित करण्यात आली. फोरमचे हे २३ वे वर्ष होते. हेमराज बिनावार यांनी ४० फूट उंचीची रावणाची प्रतिकृती तयार केली. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन माजी आ. दीनानाथ पडोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. धोंडीबाजी परसराम करवटकर यांचा नेत्रदीपक फटाका शो सादर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दिलीप पनकुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आयोजक संग्राम पनकुले व सुदर्शन पनकुले यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. रामलीलाचे आयोजन संजीवनी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती , माजी आ. सागर मेघे , अशोक मानकर, सुनील रायसोनी, राजू अग्रवाल, मिकी अरोरा, देवीलाल जयस्वाल, जयसिंह चौहान, गिरीष पांडव, योगेश कुंभलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेत देवीदास घोडे, तात्यासाहेब मते, सोपानराव शिरसाट, विक्रांत तांबे, संजय शेवाळे, श्रीनिवास दुबे, प्रा . बबलू चौहान, योगेश चौधरी, प्रमोद वानकर, मंदार हर्षे प्रल्हाद वाहोकर, प्रा. पद्माकर सावरकर, मच्छिंद्र आवळे, चेतन मस्के, विलास पोटफोडे, विजय मसराम, सूरज बोरकर, गीतेश चरडे आदिंनी परिश्रम घेतले.
नागपुरात श्रीरामाच्या गजरात रावण दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:00 AM
असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागात श्रीरामाच्या गजरात रावण दहन करण्यात आले.
ठळक मुद्देकस्तुरचंद पार्कवर रामायण अवतरले