शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

पाकिस्तानने कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर - रविशंकर प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 1:27 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य नेत्यांच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देणार नाही, पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ असे प्रतिपादन केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.

ठळक मुद्देराज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अ.भा. संमेलनास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य नेत्यांच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देणार नाही, पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ असे प्रतिपादन केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. भारत स्वत:ची सुरक्षा करण्यास पूर्णपणे सक्षम आहे असे सांगून आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय काश्मिरी जनतेच्या भल्यासाठी घेण्यात आला आहे. यात देशाचेही हित आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात झाली. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होत आहेत. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे.वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित या संमेलनाचे शनिवारी सकाळी केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.रविवारी दुपारी १२.१५ वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायमूर्ती रंजन गोगोई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.उद्घाटन कार्यक्रमानंतर राज्य विधी सेवा प्राधिकरणे आणि उच्च न्यायालय विधी सेवा समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करणे, समाजातील गरजू व्यक्तींना नि:शुल्क व सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणे, कारागृहात विधी सेवा, गुन्हे पीडितांना भरपाई, पयार्यी वाद निवारण यंत्रणा इत्यादी मुद्यांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील.

टॅग्स :Governmentसरकार