लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वीच्या तुलनेत पत्रकारितेचे स्वरुप बदलले आहे. प्रसिद्धी माध्यमांनी बदलत्या स्वरुपानुसार पत्रकारिता करावी. त्यामुळे सत्य निश्चितच पुढे येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे केले.जिल्हा महिती आणि जनसंपर्क विभाग नागपूर आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने सिव्हील लाईन्स येथील पे्रस क्लबमध्ये राष्ट्रीय पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ, जिल्हा जनसंपर्क अधिकारी अनिल गडेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे मोईज हक उपस्थित होते.ठाकरे यांनी सध्याच्या बदलत्या पत्रकारितेवर भाष्य केले. पत्रकारांनी बातम्यांचे संकलन योग्यरीत्या करण्याचे आवाहन केले. सुधीर पाठक म्हणाले, पूर्वी संपादकाच्या नावाने वृत्तपत्राची ओळख होती. पण आता ती स्थिती नाही. अनावश्यक बातम्यांवर भर देण्यात येत आहे. बातम्यांची विश्वनीयता कायम राहावी. नागरिकांनाही जागरूक राहावे.प्रदीप मैत्र आणि शिरीष बोरकर यांनी मार्गदर्शन केले.
बदलत्या स्वरुपात चालल्याने सत्य पुढे येणार: रवींद्र ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:14 PM
पूर्वीच्या तुलनेत पत्रकारितेचे स्वरुप बदलले आहे. प्रसिद्धी माध्यमांनी बदलत्या स्वरुपानुसार पत्रकारिता करावी. त्यामुळे सत्य निश्चितच पुढे येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे केले.
ठळक मुद्देराष्ट्रीय पत्रकार दिवस