गणेश हूड नागपूर : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकात एका जाहीर सभेत केलेल्या भाषणात मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. गुरुवारी या प्रकरणात गुजरातमधील सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे पडसाद नागपुरात उमटले.
नागपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने देवडिया काँग्रेस भवन येथे निदर्शने करून केंद्र सरकारच्या कुटील नितीचा निषेध करण्यात आला. देवडिया भवन ते शिवाजी महाराज पुतळया पर्यत रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.राहूलजी गांधी यांनी डिझेल-पेट्रोल घरगुती गॅस व जीवनाश्यक वस्तुच्या दरवाढीने जनता त्रस्त आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे. शासकीय कर्मचारी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला असल्याचे प्रदेश सोशल मिडिया अध्यक्ष व सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी यावेळी म्हटले.