शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

म्युकरवरील इंजेक्शनमुळे रुग्णांना रिअ‍ॅक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:07 AM

नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी लायपोसोमल’ या इंजेक्शनमुळे मेडिकलमधील रुग्णांना ‘रिअ‍ॅक्शन’ आल्याने खळबळ उडाली आहे. ...

नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी लायपोसोमल’ या इंजेक्शनमुळे मेडिकलमधील रुग्णांना ‘रिअ‍ॅक्शन’ आल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकल प्रशासनाने या इंजेक्शनच्या वापरावर बंदी आणली आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद येथील मेडिकलमध्येही असाच प्रकार घडल्याने त्या ‘बॅच’च्याही इंजेक्शनवर बंदी आणली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसने चिंता वाढवली आहे. मागील सहा दिवसांत ६७ रुग्ण व १२ मृत्यूची भर पडली. रविवारी शासकीय रुग्णालयात तीन, तर खासगीमध्ये दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५८२वर पोहचली असून, मृतांची संख्या १५० झाली आहे. रुग्ण वाढत असताना या आजाराच्या उपचारात महत्त्वाचे असलेले ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी लायपोसोमल’चा तुटवडा अद्यापही कायम आहे. प्राप्त माहितीनुसार, २३ जून रोजी ‘एलबीडी १४८’ या बॅच क्रमांकाचे ‘लायका लेब्रोटरीज्’चे ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा मोठा साठा मेडिकलला मिळाला. परंतु इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांना थंडी वाजून ताप, मळमळणे आदी लक्षणे दिसून आलीत. २५ तारखेला पुन्हा याच इंजेक्शनचा नवा स्टॉक आला असतानाही रुग्णांना तीच लक्षणे दिसून येताच मेडिकल प्रशासनाने २६ तारखेला पत्र काढून या इंजेक्शन वापरावर बंदी आणली.

-७७ इंजेक्शन परत पाठविली

मेडिकलमध्ये सध्याच्या स्थितीत म्युकरमायकोसिसचे ११८ रुग्ण उपचार घेत आहेत. २५ जून रोजी वॉर्डात मिळालेल्या इंजेक्शनमधून जवळपास ७७ इंजेक्शन परत करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या इंजेक्शन नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.

-आरोग्य विभागाकडून मिळाले इंजेक्शन

‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने मागील महिन्यापासून खरेदी व वाटपप्रक्रिया आपल्या हाती घेतली. २३ जून रोजी मेडिकलला अडीच हजारावर या इंजेक्शनचा साठा मिळाला. यात दोष असलेल्या ‘बॅच’चे इंजेक्शनचा समावेश असल्याचे एकाअधिकाऱ्याने सांगितले.