नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंकिता सुनील कनोजिया (वय २२) हिच्यावरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला तिच्या छोट्याशा पर्सने वाचा फोडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर, तिची हत्या करणाºया आरोपींनी पोलिसांकडे शरणागती पत्करल्याचीही बाब खोटी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपींना नाकाबंदी करणाºया पोलिसांनी ताब्यात घेतले अन् चौकशीनंतर त्यांना अटक केल्याची माहिती खास सूत्रांकडून प्रस्तुत प्रतिनिधीला मिळाली आहे. त्यामुळे या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी शरणागती पत्करल्याची बातमी का पेरली, असा संशय वाढवणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.पोलीस मुख्यालयात कार्यरत सहायक उपनिरीक्षक सुनील ऊर्फ बबलू कनोजिया यांची अभियंता असलेली मुलगी अंकिता नुकतीच नोकरीला लागली होती. १५ आॅगस्टला तिला तिचे वडील सुनील कनोजिया यांनी मुंबईला नेऊन सोडले होते. रोजच परिवारातील सदस्यांसोबत फोनवरून संपर्कात असलेल्या अंकिताचे तिच्या परिवारातील सदस्यांसोबत शेवटचे बोलणे ४ सप्टेंबरला सकाळी झाले. त्यानंतर तिचा मोबाईल दोन दिवसांपासून लागतच नव्हता. चिंताग्रस्त कनोजिया परिवार अंकिताची माहिती काढण्याचा प्रयत्न करीत होते. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास त्यांना अंकिताची हत्या झाल्याचे धक्कादायक वृत्त कळले. त्यानंतर नागपुरात एकच खळबळ उडाली. अंकिताची हत्या करणाºया दोन आरोपींनी रत्नागिरी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी देऊ लागले.या दोन आरोपींना त्यांच्या नीलेश खोब्रागडे नामक मित्राने आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याचेही वृत्त आले. मंगळवारी लोकमतने या संबंधाने रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला असता तेथील पोलीस अधीक्षक अशोक प्रणय यांनी अशीच काहीशी माहिती देऊन फोन बंद केला. तब्बल तीन दिवसांपासून लोकमत या प्रकरणाची बारीकसारीक माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून आज प्रस्तुत प्रतिनिधीला खळबळजनक माहिती मिळाली. त्यानुसार, आरोपींनी आत्मसमर्पण केल्याची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा खास सूत्रांनी केला आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, निखिलेश पाटील, अक्षय वाळूदे आणि नीलेश खोब्रागडे या तिघांनीही अंकितावर बलात्कार केला. तिचा मृतदेह बेळगाव निपाणीच्या जंगलात फेकून दिल्यानंतर आरोपी रत्नागिरी मार्गे नागपूरला यायला निघाले. रत्नागिरी पोलिसांची रस्त्यावर नाकाबंदी सुरू होती.सूत्रांच्या दाव्यानुसार, निखिलेश पाटील, अक्षय वाळूदे आणि नीलेश खोब्रागडे या तिघांनीही अंकितावर बलात्कार केला. तिचा मृतदेह बेळगाव निपाणीच्या जंगलात फेकून दिल्यानंतर आरोपी रत्नागिरी मार्गे नागपूरला यायला निघाले. रत्नागिरी पोलिसांची रस्त्यावर नाकाबंदी सुरू होती. पोलिसांनी या तिघांची कार थांबवली. आतमध्ये डोकावले असता मागच्या सीटवर पोलिसांना एक लेडिज पर्स दिसली. ओढणी अन् असेच कपडेही पडून होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी या तिघांना विचारपूस केली.ते गोंधळल्यासारखे झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. लेडिज पर्स आणि कपडे आहे, लेडिज कुठे आहे, असा थेट प्रश्न पोलिसांनी त्यांना केला. त्यानंतर नागपूरच्या आमच्या एका मैत्रिणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आणि मृतदेह कर्नाटक-महाराष्टाच्या सीमेवरील बेळगाव निपाणीनजिक फेकल्याची माहिती निखिलेश आणि अक्षयने पोलिसांना दिली. अशा प्रकारे अंकिताच्या पर्सने तिच्यावरील सामूहिक बलात्कार आणि हत्येला वाचा फोडली.आरोपींवर विश्वास कशापोटी?विशेष म्हणजे, कारमध्ये तिघे होते. सामूहिक बलात्कार आणि हत्या मात्र दोघांनीच (निखिलेश आणि अक्षयने) केल्याचे पोलिसांना सांगितले अन् धक्कादायक बाब अशी की रत्नागिरी पोलिसांनीही आरोपींच्या कथनावर विश्वास ठेवला. तशा प्रकारची माहिती पहिल्या दिवशी रत्नागिरी पोलिसांकडून नागपुरात कळली. एका पोलीस पुत्रीवर सामूहिक बलात्कार झाला अन् तिची हत्या करण्यात आली. त्यानंतरही आरोपींबाबत तब्बल चार दिवस नागपूरकर पोलिसांना या खळबळजनक प्रकरणातील तथ्य कळू शकले नाही. तथ्यहीन माहितीवर नागपूरकर जनताच नव्हे तर पोलीस कर्मचारीही विश्वास ठेवून राहिले. आज शुक्रवारी मात्र या प्रकरणात अंबरनाथ (ठाणे) पोलिसांनी बिल्डर नीलेश खोब्रागडेलाही अटक केली.नीलेशच सूत्रधार ?विशेष म्हणजे, आरोपींना नीलेश खोब्रागडेने आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यामुळे त्यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गंभीर गुन्ह्याचा आरोप स्वीकारला. त्यामागचे कारणही वरिष्ठ सूत्रांकडून कळले. ‘आपला पोलीस दलात चांगला प्रभाव आहे. अनेक वरिष्ठांसोबत आपले संबंध आहेत. तुम्ही आरोप स्वीकारा मी तुम्हाला लगेच बाहेर काढतो. तुमचे लाईफ सेट करून देतो’, असे नीलेशने निखिलेश आणि अक्षयला म्हटले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. आरोपी स्वत:हून ठाण्यात आला तरी कोणत्याही ठिकाणचे पोलीस त्याला आम्ही पकडून आणल्याचा दावा करतात. ही पार्श्वभूमी असताना रत्नागिरी पोलिसांनी आरोपींच्या आत्मसमर्पणाचा कांगावा का केला, ते कळायला मार्ग नाही.
अंकिताच्या पर्सने फोडली वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:47 AM
अंकिता सुनील कनोजिया (वय २२) हिच्यावरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला तिच्या छोट्याशा पर्सने वाचा फोडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
ठळक मुद्देसामूहिक बलात्कार हत्याप्रकरण : आरोपींनी शरणागती पत्करल्याची बाबही खोटी ?