लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री देसाई, आदी ऑनलाईन उपस्थित झाले होते.
नागपूर येथून बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू उपस्थित होते. खरीप हंगामासाठी नागपूर जिल्हा पूर्णपणे सज्ज आहे, अशी ग्वाही प्रशासनाने यावेळी दिली.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी त्यांच्या मागणीनुसार खते, बियाणे तसेच पीककर्जाचे वाटप सुलभपणे होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व संबंधित कृषी अधिकारी यांनी कालबद्ध नियोजन करून शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
बॉक्स
खरीप हंगाम : एक कटाक्ष
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ९,८६,३८३ हेक्टर
सर्वसाधारण खरीप क्षेत्र ४,७४,३२५ हेक्टर
२०२१-२२ एकूण ४,७५,३०० हेक्टर क्षेत्रावर ४,१३,६३४ मेट्रिक टन उत्पादनाचा लक्ष्यांक
भात, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, कापूस, इत्यादी पिकांचा समावेश आहे.