लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक असलेल्या क्षेत्रात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद (ड्राय डे) राहणार आहेत.
काटोल तालुक्यात ३, नरखेडमध्ये १७, सावनेर १२, कळमेश्वर ५, रामटेक ९, पाारशिवनी १०, मौदा ७, कामठी ९, उमरेड १४, भिवापूर ३, कुही २५, नागपूर ग्रामीण ११ आणि हिंगणा तालुक्यातील ५ ग्राम पंचायतीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात मतदानाच्या आधीच्या दिवसापासून म्हणजे उद्या ,१४ जानेवारीपासून ते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीपर्यंत संपूर्ण दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहतील. तसेच सोमवारी १८ जानेवारीला तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी असलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत मद्यविक्री बंद राहील. नागपूर ग्रामीण ताालुक्यात मतमोजणी असलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरात ही बंदी लागू राहील.