लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोव्हेंबर २००५ पासून लागलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल एक तपानंतर अंशदाय पेन्शनच्या पावत्या (डीसीपीएस) मिळाल्या. वेतन पथक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते डॉ. बबनराव तायवाडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक मिलिंद वानखेडे, लेखाधिकारी हरीश शेगावकर उपस्थित होते. राज्य शासनाने नोव्हेंबर २००५ पासून लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून अंशदाय पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली. या योजनेला शिक्षक व अन्य कर्मचारी सुरुवातीपासूनच विरोध करीत आहे. मात्र या विरोधातही कर्मचाऱ्यांकडून कपात करण्यात आलेल्या रक्कमेचा हिशोब तातडीने देण्यात यावा या मागणीसाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने याची दखल घेत पावत्या देण्याचे जाहीर केले. त्याअंतर्गत प्राथमिक वेतन पथक अधीक्षक कार्यालयात अंशदाय पेन्शनच्या (डीसीपीएस) पावत्या प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आल्या. यात सात पावत्या तातडीने देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजेंद्र खंडाईत, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, समीर काळे, रविकांत गेडाम, महेश गिरी, मेघराज फुलके, आत्माराम बावनकुळे, जितेंद्र बिलवणे, प्रणाली रंगारी, दिनेश गेटमे, कैलास हनवते, मोहम्मद जाफर, योगेश शोभने, प्रमिला झाडे, गणेश उघडे, रवींद्र गुर्जर, राजेश जांभुळकर, नीलेश दुहीजोड, उज्ज्वला खोडे, सविता भेलावे, सागर भगोले, नितीन पंधरे, मनीषा निनावे, मनोरमा कंगाले, भास्कर आडे, प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते.
एक तपानंतर मिळाल्या डीसीपीएसच्या पावत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:24 AM
नोव्हेंबर २००५ पासून लागलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल एक तपानंतर अंशदाय पेन्शनच्या पावत्या (डीसीपीएस) मिळाल्या. वेतन पथक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्याचे वितरण करण्यात आले.
ठळक मुद्देनागपूर जिल्हा ठरला राज्यात अव्वल