लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती. त्यासाठी काही शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. हल्ली हा कालवा कोरडा असून, काहींनी त्यावर अतिक्रमण करून घरांचे व दुकानांचे बांधकाम केले. हा कालवा निरुपयोगी ठरल्याने पाटबंधारे विभागाने संबंधित शेतकºयांच्या अधिग्रहित जमिनी परत कराव्यात, अशी मागणी भानेगाव शेतकºयांनी केली आहे.खापरखेडा, चिचोली, पोटा, चनकापूर, भानेगाव, वलनी भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाने या भागात कालव्याची निर्मिती केली. त्यासाठी १९७४ साली या भागातील काही शेतकºयांच्या शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांनी अनेकदा केली, परंतु त्यात कधीच पाणी सोडण्यात आलेनाही. हा कालवा वर्षानुवर्षे निरुपयोगी असल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे चनकापूर येथील वेकोलि कॉलनीतील काहींनी या कालव्यावर अतिक्रमण केले आणि तो सपाट करून त्यावर घरे व दुकानांचे बांधकाम केले.या कालव्याचा काडीचाही उपयोग नसल्याने तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याने, या जमिनी संबंधित शेतकºयांना परत करण्याची मागणी खुद्द शेतकºयांनीकेली.त्याअनुषंगाने या विषयावर सावनेर पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. या जमिनींचे अधिग्रहण १९७४ साली करण्यात आले असून, त्यावेळी संबंधित शेतकºयांना त्यांच्या जमिनींचा अत्यल्प आर्थिक मोबदला देण्यात आला होता.ओलितासाठी शेतकºयांना थेंबभरही पाणी न मिळाल्याने या व्यवहारात शासनाने शेतकºयांची फसवणूक केली, असा गंभीर आरोपही शेतकºयांनी केला.सध्या पाटबंधारे विभागाच्या या जागेवर झोपडपट्टी वसली आहे. पाटबंधारे विभागाने काहींना आॅगस्ट-२०१७ मध्ये नोटीस पाठवून अतिक्रमित जागेवरील दुकाने खाली करण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. पाटबंधारे विभाग दरवर्षी या नोटीस पाठविण्याचे काम करीत असून, अतिक्रमण हटविण्याची कारवाई कधीच करीत नाही, असा आरोपही शेतकºयांनी केला.या अधिग्रहित जागेचा शासनाला कोणताही उपयोग नाही. त्यामुळे ती जमीन संबंधित शेतकºयांना परत करण्यात यावी किंवा त्या जागेचा वापर खापरखेडा-भानेगाव- चनकापूर बायपास रोड तयार करण्यासाठी करावा, अशी मागणीही शेतकºयांनी केली आहे.
अधिग्रहित जमिनी परत करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:41 AM
परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती.
ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : कालव्यावर अतिक्रमण करून घरांचे बांधकाम