लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही आजवर स्पष्टीकरण सादर केलेले नाही. याची दखल घेत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला आहे. या अहवालात त्यांनी चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे तसेच पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसतर्फे २५ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात स्पष्टीकरण मागितले होते. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसच्या लेखी सूचनेवरून ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, चतुर्वेदी यांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही. उलट अशी कुठलीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत वादविवाद निर्माण करणे, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांना मदत करणे, उघडपणे बंडखोर उमेदवारांचा प्रचार करणे, याशिवाय बºयाच कालावधीपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही चतुर्वेदी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, चतुर्वेदी यांनी पहिल्या दिवसापासून अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचा आरोप करीत हा विकास ठाकरे यांचा खोडसाळपणा असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकींतर्गत शहर काँग्रेसची निवडणूक रद्द झाली आहे. त्यामुळे शहर काँग्रेसला कुणालाही नोटीस पाठविण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद चतुर्वेदी यांनी केला होता. विशेष म्हणजे या नोटीसीनंतरही चतुर्वेदी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत श्रद्धांजलीचा वेगळा कार्यक्रम घेतला होता.चतुर्वेदी यांच्याबाबत ज्यांनी प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी केल्या होत्या त्यांनी आपले म्हणजे पुराव्यासह शहर काँग्रेसकडे सादर केले. तर चतुर्वेदी यांनी नोटीसला कुठलेही उत्तर दिले नाही. या आधारावर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या घटनाक्रमाचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला आहे. आता प्रदेश काँग्रेस चतुर्वेदी यांच्याबाबत काय भूमिका घेत याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे चतुर्वेदी यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या नोटीसला उत्तर दिलेले नाही. त्यांच्याबाबत तक्रारी करणाऱ्यांनी मात्र पुराव्यासह त्यांचे म्हणणे सादर केले आहे. या सर्व वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्यात आला आहे.- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेसचतुर्वेदी दिल्लीत तळ ठोकून काँग्रेसच्या नोटीसनंतर चतुर्वेदी यांच्यावर कारवाई होईल की नाही यावर नागपुरात दावे-प्रतिदावे केले जात आहे. मात्र, चतुर्वेदी हे स्वत: दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांच्या दिल्ली वास्तव्यामुळे पक्षात काहीतरी घडामोडी सुरू असल्याचे संकेत आहेत. चतुर्वेदी कारवाई टाळण्यासाठी दिल्लीत धावपळ करीत असल्याचा मुत्तेमवार समर्थकांचा दावा आहे. तर चतुर्वेदी हे नेत्यांसमोर वास्तविकता मांडण्यासाठी गेले असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.