न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 30, 2022 12:11 PM2022-09-30T12:11:05+5:302022-09-30T12:15:10+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा निर्णय

Recommendation for appointment of Justice Prasanna Varale as Chief Justice of Karnataka HC | न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस

googlenewsNext

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केंद्र सरकारला केली आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वात कॉलेजियमची बैठक झाली. त्यात  हा निर्णय घेण्यात आला. न्यायमूर्ती वराळे यांनी कायद्याची पदवी मिळविल्यानंतर ऑगस्ट-1985 पासून ऍड. एस. एन. लोया यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी औरंगाबाद येथील आंबेडकर विधी महाविद्यालयात 1990 ते 1992 पर्यंत प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सहाय्यक सरकारी वकील म्हणून देखील काही काळ कार्यरत होते. त्यानंतर 18 जुलै 2008 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते या न्यायालयात कार्यरत आहेत.

Web Title: Recommendation for appointment of Justice Prasanna Varale as Chief Justice of Karnataka HC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.