शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

चार वर्षात ५८ गुन्ह्यांची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:09 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : पर्यावरणाचा समताेल राखण्यासाठी वृक्ष हा महत्त्वाचा घटक असला तरी अवैध वृक्षताेडीचे प्रमाणही वाढले आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : पर्यावरणाचा समताेल राखण्यासाठी वृक्ष हा महत्त्वाचा घटक असला तरी अवैध वृक्षताेडीचे प्रमाणही वाढले आहे. अशा प्रकरणांमध्ये वन विभागाकडून कारवाईदेखील केली जाते. कळमेश्वर वनपरिक्षेत्रात वन विभागाने चार वर्षांमध्ये अवैध वृक्षताेडसंदर्भात एकूण ५८ गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली. त्या अंतर्गत जप्त केलेल्या लाकडाच्या लिलावातून वन विभागाला एकूण १० लाख ३५ हजार ४६४ रुपयाचा महसूल मिळाला, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नाैकरकर यांनी दिली.

कळमेश्वर परिक्षेत्रांतर्गत एकूण ४१६२.८३ हेक्टर वनक्षेत्र आहे. येथील जंगलात काही बहुमूल्य वनस्पतीदेखील आहेत. मागील काही वर्षांपासून अवैध वृक्षताेडीचे प्रमाण वाढले आहे. ही मंडळी शेताचे धुरे, शिवारासाेबत जंगलातील झाडे परस्पर ताेडून त्याची विल्हेवाट लावतात आणि पैसा कमावतात. यात सागवान झाडे ताेडून ते चाेरून नेण्याचे प्रमाण अधिक आहे. वन विभागाने कळमेश्वर वनपरिक्षेत्रात २०१७ ते २०२० या चार वर्षात अवैध वृक्षतोडीचे एकूण ५८ गुन्हे नाेंदविले आहेत. या सर्व कारवाईमध्ये ६१७ सागवान व ११२ इतर वृक्षांचे एकूण ३६.३५६ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या लाकडाची लिलावाच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यात आली. यात वन विभागाला सागवानापासून १० लाख २३ हजार ९७१ रुपये व इतर वृक्षापासून ११ हजार ४९३ रुपयाचा महसूल प्राप्त झाला.

कुसुंबी (ता. कळमेश्वर) शिवारातील पांदण रस्त्यालगतची ३० ते ३५ वर्षे वयाची सागवान झाडे ताेडण्यात आल्याचे नुकतेच उघड झाले. त्या लाकडाची किंमत एक ते दीड लाख रुपये असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चाेरट्यांचा हा प्रयत्न फसला. ती लाकडे जप्त करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नाैकरकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक सुनील फुलझेले, वनरक्षक पी. आर. मानकर, रफीक मोहब्बे, बी. एस. बोरकर, श्रावण नागपुरे व मंगेश पांडे यांच्या पथकाने केली.

...

१०.३५ लाखाचा महसूल प्राप्त

वन विभागाला कळमेश्वर वनपरिक्षेत्रातून चार वर्षात एकूण १० लाख ३५ हजार ४६४ रुपयाचा महसूल मिळाला. सन २०१७ मध्ये १८ गुन्हे नाेंदविण्यात आले असून, लाकडाचे १२७ नग जप्त करण्यात आले. त्यातून १ लाख ५७ हजार ३६० रुपये मिळाले. सन २०१८ मध्ये १६ गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली असून, लाकडाचे ४५८ नग जप्त केले. त्यातून ८ लाख ५३ हजार ४३४ रुपये मिळाले. सन २०१९ मध्ये १६ गुन्हे दाखल करून लाकडाचे २३ नग जप्त केले. त्यातून १६ हजार ३३२ रुपये तर सन २०२० मध्ये आठ गुन्ह्याची नाेंद करण्यात आली असून, जप्त केलेल्या लाकडाच्या ७५ नगाच्या लिलावातून ८,३३८ रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे.