नागपूर : राज्यातील वाढत्या उष्णतेसोबतच विजेची मागणीही वाढली आहे. या मागणी-पुरवठ्यात नेहमी तुटीचा अनुभव असला तरी, या काळातही महाजनकोने वीज उत्पादनाचा विक्रम स्थापित केला आहे. २० मे २०१९ रोजी राज्यातील विजेचे उत्पादन १०,०९८ मेगावॅट होते. त्यापेक्षाही पुढे जाऊन मंगळवारी दुपारी ४.४० वाजता महाजनकोने १०,४४५ मेगावॅट उत्पादन केले आहे. यादरम्यान राज्यातील विजेची मागणीही वाढून २२,१२९ मेगावॅट झाली आहे.
राज्यातील आजवरच्या वीज उत्पादनातील हा उच्चांक आहे, हे विशेष! मंगळवारी दुपारी महावितरणची मागणी २२,१२९ मेगावॅट नोंदविली गेली. १० हजार मेगावॅटच्या अधिक उत्पादन होण्याची ही तिसरी वेळ आहे. ८ मार्चलादेखील कंपनीने १०,०९७ मेगावॅट विजेचे उत्पादन केले होते. राज्यातील वाढती उष्णता आणि औद्याेगिक मागणीमुळे ही वाढ नोंदविण्यात आली आहे.
...
कुणाचा किती वाटा
प्रकल्प उत्पादन (मेगावॅट)
कोळसा औष्णिक : ७,९९९
पवनचक्की : २६४
जल औष्णिक : २,१३८
सौर ऊर्जा : ५०
....
बॉक्स
केंद्राकडूनही ६,३७५ मेगावॅटचे योगदान
केंद्राच्या विद्युत प्रकल्पांचेदेखील महाराष्ट्रातील वाढत्या विजेच्या मागणीसाठी पुरवठा करण्यात योगदान आहे. या योजनांच्या माध्यमातून राज्याला ६,३७५ मेगावॅट वीज मिळाली. तर खासगी प्रकल्पांच्या माध्यमातूनही ५,७७१ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात आला.
...