शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

राज्यात विजेच्या मागणीत ‘रेकॉर्ड’ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:02 AM

कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समोर गेली आहे. त्यामुळे राज्यात ‘लोडशेडिंग’ कायम आहे.

ठळक मुद्देकोळशाची कमतरता कायम : कमी पावसामुळे कृषिपंपांचा उपयोग वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समोर गेली आहे. त्यामुळे राज्यात ‘लोडशेडिंग’ कायम आहे.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार ‘आॅक्टोबर हिट’मुळे २२ आॅक्टोबर रोजी विजेची मागणी २४ हजार ९६२ मेगावॅटपर्यंत पोहोचली. यात मुंबईतील ३,३८२ मेगावॅटची मागणीदेखील समाविष्ट आहे. मंगळवारीदेखील ही स्थिती कायम होती. सकाळी ११ वाजता २१,३१६ मेगावॅटची मागणी नोंदविण्यात आली. मुंबईसह संपूर्ण राज्यात १६ आॅक्टोबर रोजी २४,९२२ मेगावॅट, १७ तारखेला २४,६८७ मेगावॅटची मागणी नोंदविल्या गेली. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात २१,५८० मेगावॅट विजेची आवश्यकता होती. यातुलनेत महावितरणकडे केवळ २०,६३० मेगावॅट वीज उपलब्ध होती. यामुळे अधिक वीजहानीच्या ग्रुप ‘जी-१’, ‘जी-२’ आणि ‘जी-३’ येथे एकूण ९५० मेगावॅटची ‘लोडशेडिंग’ करावी लागली, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.राज्यात कमी पावसामुळे सिंचनासाठी कृषिपंपांचा वापर वाढला आहे. तसेच आॅक्टोबरमध्ये तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. त्यामुळे विजेची मागणी वेगाने वाढत आहे. दुसरीकडे राज्यात औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रांमधील तीन युनिट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद आहेत.पुरवठ्याला फटकाविजेच्या वाढत्या मागणीत महावितरणला खुल्या बाजारातून महागड्या दरात ३,६५२ मेगावॅट वीज खरेदी करावी लागत आहे. महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या प्रत्येक स्रोतातून कमी वीज मिळत आहेत. ‘पॉवर एक्सचेंज’मधून राज्याला मिळालेल्या ३ हजार मेगावॅट आणि बँकमधून मिळणाºया १८८ मेगावॅटने काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण