लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी येथील रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याने कर्जदारांकडून वसूल केलेल्या कर्जाच्या किस्तीचे २.८२ लाख रुपये कंपनीत जमा न करता अपहार केला.शेषराव इरपाते (२७) रा. सोनेगाव लोधी निवास असे आरोपीचे नाव आहे. शेषराव हा कंपनीत वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होतो. कंपनीच्या कर्जधारकांकडून किस्तीची रक्कम जमा करण्यासाठी त्याच्याकडे इंटक प्रिंटर मशीन सोपवण्यात आली होती. ग्राहकाकडून कर्जाच्या हप्त्याची रक्कम घेऊन मशीनद्वारे त्याला पावती द्यावयाची होती. जानेवारी ते डिसेंबर २०१७ पर्यंत शेषरावने ग्राहकाकडून २ लाख ८२ हजार ५९७ रुपये इतकी हप्त्याची रक्कम वसूल केली. परंतु ती रक्कम त्याने फायनान्स कार्यालयात जमा केली नाही. ही रक्कम त्याने स्वत: खर्च केली. फायनान्स कंपनीचे अधिकारी प्रशांत भोंडे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वसुली अधिकाऱ्याने केला २.८२ लाख रुपयांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:04 PM
वाडी येथील रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याने कर्जदारांकडून वसूल केलेल्या कर्जाच्या किस्तीचे २.८२ लाख रुपये कंपनीत जमा न करता अपहार केला.
ठळक मुद्देरुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीचा वसुली अधिकारी