लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. पण २१ आणि २२ मे या दिवशी विदर्भात रेड अलर्ट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दिवशी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गरमीचा प्रकोप वाढणार आहे.नागपुरात गेल्या २४ तासात कमाल तापमानात दीड अंश सेल्सिअस घसरण होऊन ४३.९ अंशावर स्थिरावले. पण रात्रीच्या तापमानात नागपूर सर्वात पुढे असून किमान तापमान ३२.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. ते सामान्यापेक्षा ५ अंश जास्त आहे. गेल्या २४ तासात रात्रीचे तापमान २.६ अंश सेल्सिअसने वाढले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार मेच्या दुसऱ्या आठवड्यात गरमीचा प्रकोप सर्वाधिक असतो. सध्या गरमीपासून सुटका मिळण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. रेड अलर्टदरम्यान अनेक शहरांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक आहे. शनिवारी चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ब्रह्मपुरीमध्ये ४५.५, वर्धा ४४, अकोला ४३.६, गडचिरोली ४३.४, गोंदिया ४३.२, अमरावती ४३, वाशिम ४२.६, यवतमाळ ४२.५, बुलडाणा ४०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:10 PM
विदर्भातील बहुतांश जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. पण २१ आणि २२ मे या दिवशी विदर्भात रेड अलर्ट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दिवशी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गरमीचा प्रकोप वाढणार आहे.
ठळक मुद्देउकाडा वाढला : रात्रीचे तापमान वाढले