लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यापासून लोकांना वीजबिल आले नाही. आता तीन महिन्याचे बिल एकाचवेळी पाठवण्यात आले. ते सरासरीपेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. अव्वाच्या सव्वा वाढीव बिल आल्याने यात कपात करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी ऊर्जामंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदनपर पत्रही पाठवले आहे.कोरोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील अनेक लोकांच्या हाताला काम नाही. अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले, अशा परिस्थितीत एकाच वेळी तीन महिन्याचे बिल पाठवण्यात आले आहे, ते ग्राहकांनी भरणे शक्य नाही. त्यामुळे वाढीव बिलात कपात करून नागरिकांना दिलासा द्यावा. असे केल्यास वीज ग्राहक बिल भरतील आणि बिल थकीतही राहणार नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
वाढीव वीज बिल कमी करा : विकास ठाकरे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:32 PM
तीन महिन्यापासून लोकांना वीज बिल आले नाही. आता तीन महिन्याचे बिल एकाचवेळी पाठवण्यात आले. ते सरासरीपेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. अव्वाच्या सव्वा वाढीव बिल आल्याने यात कपात करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली.
ठळक मुद्देमुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना लिहिले पत्र