लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा/काटाेल/रामटेक/कळमेश्वर/सावनेर/उमरेड : नागपूर ग्रामीणमध्ये काेराेना संक्रमण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. ३०) प्राप्त झालेल्या काेराेना चाचणी अहवालांवरून ३५७ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, यात नागपूर ग्रामीणमधील १३२ तर नागपूर शहरात २२० नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात रविवारी सर्वाधिक म्हणजेच २२ रुग्ण आढळून आले असून, काटाेल तालुक्यात सात, रामटेक तालुक्यात पाच, कळमेश्वर व सावनेर तालुक्यात प्रत्येकी चार आणि उमरेड तालुक्यात दाेन नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे.
हिंगणा तालुक्यात रविवारी २२ नवीन रुग्णांची भर पडली. हे सर्व रुग्ण तालुक्यातील १३ गावांमधील आहेत. तालुक्यात सर्वाधिक नऊ रुग्णांची नाेंद वानाडाेंगरी शहरात करण्यात आली. परिणामी, तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णसंख्या ११,८९८ झाली असून, यातील ११,०१९ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या २७८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काटाेल तालुक्यात रविवारी १३० नागरिकांच्या काेराेना टेस्टचे रिपाेर्ट प्राप्त झाले. यात सात जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यातील एक रुग्ण काटाेल शहरातील रहिवासी असून, उर्वरित सहा रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. या सहा रुग्णांमध्ये पाच रुग्ण कचारीसावंगा प्राथमिक आराेग्य केंद्र तर एक रुग्ण येेनवा प्राथमिक आराेग्य केंद्राच्या हद्दीतील गावामधील रहिवासी आहे. रामटेक तालुक्यात रविवारी ३७ नागरिकांच्या काेराेना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून, यात पाच जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये एक रुग्ण रामटेक शहर तर चार जण ग्रामीण भागातील राहणारे आहेत. नवीन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णांची संख्या ६,५१५ झाली असून, यातील ६,३१० रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. काेराेनामुळे आजवर एकूण १२३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात २०५ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी दिली.
कळमेश्वर व सावनेर तालुक्यात प्रत्येकी चार नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. कळमेश्वर तालुक्यातील चार रुग्णांमध्ये दाेघे कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील तर दाेघे ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. यात नांदिखेडा व मांडवी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सावनेर तालुक्यातील चार काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण हे ग्रामीण भागातील रहिवासी असून, सावनेर शहरात एकही पाॅझिटिव्ह रुग्णाची रविवारी नाेंद करण्यात आली नाही. उमरेड तालुक्यात दाेन रुग्णांनी नाेंद करण्यात आली. यात उमरेड शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आहे. ही आजवरची सर्वात कमी संख्या आहे.