शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

गरजा कमी करा, जीवनाचे गणित सुटेल

By admin | Published: March 16, 2015 2:35 AM

घरची परिस्थिती बेताची. वडील कपडे डोक्यावर घेऊन बाजारात विकायला जायचे. हळुहळू परिस्थिती बदलली अन् वडिलांनी चांगले दुकान थाटले.

नागपूर : घरची परिस्थिती बेताची. वडील कपडे डोक्यावर घेऊन बाजारात विकायला जायचे. हळुहळू परिस्थिती बदलली अन् वडिलांनी चांगले दुकान थाटले. पैसाही मिळू लागला. परंतु वडिलांनी मेहनत कमी केली नाही. एवढा पैसा कशाला हवा, असा विचार मनात आला आणि पैशांचा तिरस्कार वाटायला लागला. त्यामुळे गरजा कमी केल्या की जीवनाचे गणित नक्की सुटते, असे मत प्रयार सेवांकुर संस्थेचे अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.प्रयास सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट व स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बी. आर. ए. मुंडले सभागृहात आयोजित ‘आम्ही बिघडलो ! तुम्ही बी घडाना’ या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. आल्हाद काशीकर आणि मनोज गोविंदवार यांनी हसतखेळत त्यांना बोलते केले. अविनाश सावजी म्हणाले, बुलडाण्यातील सिंदखेडराजात मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. घरात आईवडिल, चार बहिणी आणि दोन भाऊ होते. वडील शिकलेले नसले तरी मुलांना शिकविले. दुकानात वडिलांना एकेका पैशाचा हिशेब जुळल्याशिवाय जमत नव्हते. त्यांच्यामुळे माझेही जीवनाचे गणित पक्के झाले. वडिलांच्या स्वभावात अहंकार होता. तोच स्वभाव मला लाभला. काही लोकांचा अहंकार त्यांना मोठा करतो. परंतु अहंकार कुठे बाळगायचा याचे भान हवे. बारावीत चांगले गुण मिळाल्याने नागपुरात एमबीबीएसला प्रवेश घेतला. चार मित्रांचा ग्रुप जमला. परंतु चांगले बोलता येत नसल्यामुळे कमीपणा वाटायचा. इंग्रजीतून शिकवत असल्यामुळे दोन महिने काहीच कळाले नाही. पहिल्याच युनिट टेस्टमध्ये पहिला आलो. आत्मविश्वास वाढू लागला. बाबा आमटे, संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांना मोठे व्यक्ती म्हणून नव्हे तर बालपणी ते कसे होते या दृष्टीने पाहुन त्यांनाच जीवनाचे कन्सलटंट केले. वडिलांच्या १५० रुपयांच्या मनिआॅर्डरमध्ये विवेकानंदांची पुस्तके घेतली. त्यामुळे जीवनच बदलले. उपाशी राहायला शिकलो. एमबीबीएस झाल्यावर पुढे शिक्षणाची इच्छा नव्हती. घरच्यांच्या दबावामुळे नोकरी स्वीकारली. ती सोडून अमळनेरला मोबाईल हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. त्यांनी भोपाळला कॅम्प घेतला. तेथे सोहोनीशी भेट झाली. तिच्या भावाचा मोठे हॉस्पिटल थाटण्याचा सल्ला आवडला नाही. सोहोनीच्या गावातच दवाखाना सुरू केला. आपल्या गरजा कमी करून सोहोनीशी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर अमरावतीत एका खेड्यात १२०० रुपये महिन्यात काम सुरू केले. व्यवस्थापनाशी संघर्ष झाला. चांदूरबाजारला १८०० रुपये महिन्याने खोली भाड्याने घेतली. १९९४ ला प्रयास संस्था सुरू केली. सुरुवातीला ३ हजार वेतन मिळत होते. सध्या १२५०० रुपये वेतन घेतो. मागील वर्षी संस्थेची पहिली इमारत अमरावतीत उभारली. संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्य करण्यात येतात. जीवनात परीक्षा घेणारे अनेक क्षण येतात त्यामुळेच माणसाचा खरा विकास होतो. पुढे आपण सुधारणार असे सोहोनीला वाटले त्यामुळे तिने लग्नास होकार दिला. परंतु तसे झाले नसल्यामुळे आजही आमची भांडणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘हृदय संवाद’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रगट मुलाखतीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)