नागपूर: अमेरिकन आणि युरोपियन कोरोनरी आर्टरी (डिसीज) संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनही भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधातील रोगांमध्ये ४१ टक्के वाढ झाली. या उलट पश्चिमात्य देशात या रोगाच्या मृत्यूदरात ५० टक्क्याने घट झाली. या गंभीर परिस्थितीला लक्षात घेऊन, पश्चिमात्य मार्गदर्शक तत्वांच्या तुलनेत भारतात ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ची पातळी १० एमजी/डीएलने कमी असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, तरुण वयातच ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ची पातळी कमी केल्यास पुढे हृदयरोग रोखणे शक्य आहे, असे मत इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट व लिपिड असोसिएशन आॅफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी यांनी व्यक्त केले.
कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखा, लिपिड असोसिएशन आॅफ इंडिया, असोसिएशन आॅफ फिजिशियन्स आॅफ इंडिया विदर्भ चॅप्टर आणि डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया नागपूरच्यावतीने रविवारी ‘लीपीडोलॉजी अपडेट-२०२४’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळे ते मुख्यमार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर लिपिड असोसिएशन आॅफ इंडियाचे सल्लागार डॉ. सदानंद शेट्टी, डॉ. चरणजीत सिंग, डॉ. जय देशमुख, डॉ. निखील बालंखे, डॉ अजीज खान व डॉ नितीन देशपांडे आदी उपस्थित होते.
-हृदयरोग टाळण्यासाठी लवकर निदान आवश्यक डॉ. पुरी म्हणाले, बॅड कोलेस्टेरॉल ची पातळी ७० एमजी/डिएलने वाढलीतरी त्याची लक्षणे दिसून येतीलच असे नाही. मात्र, नंतर त्याचे धोके आढळून येतात. ते टाळण्यासाठी तरुण वयातच बॅड कोलस्ट्रॉलची पातळी ४० एमजी/डिएलपर्यंत आणने आवश्यक आहे. यामुळे पुढे आयुष्यात होणाºया हृदयरोगाला ५२ टक्क्यांपर्यंत रोखता येते.
-अचानक मृत्यू टाळण्यासाठी कोलेस्टेरॉलची तपासणी कराकुटुंबात कोणाला ‘बॅड कोलेस्टेरॉल’चा इतिहास नसलातरी हृदयविकार आणि तरुण वयात अचानक मृत्यू टाळण्यासाठी १८ ते २० वयोगटातील युवकांनी दरवर्षी कोलेस्टेरॉल व रक्तातील साखरेची तपासणी करणे गरजेचे आहे. प्रारंभिक तपासणी दरम्यान उच्चर क्तदाब तपासण्याचा सल्लाही डॉ. रमण यांनी दिला.
-बॅड कोलेस्टेरॉलची पातळी ७० एमजी,डीएल पेक्षा कमी असावीडॉ. रमण म्हणाले, सामान्य लोकांनी ‘बॅड कोलेस्टेरॉल’ची पातळी ७० एमजी/डीएल पेक्षा कमी ठेवावी. मधुमेहाचे निदान होताच उच्च कोलेस्टेरॉलसाठी उपचार सुरू करणे गरजेचे आहे.
-हृदयरोगाच्या रुग्णांची पातळी ५० एमजी/डीएल पेक्षा कमी असावीज्यांना हृदयरोग आहे किंवा हृदयरोगाचा धोका आहे त्यांची ‘बॅड कोलेस्टेरॉल’ची पातळी ५० एमजी/डीएलपेक्षा कमी असावी. या शिवाय, निरोगी जीवनशैली आत्मसात करावी. धूम्रपान व तंबाखू टाळायला हवे. नियमीत व्यायामासोबत ३० मिनीटे वेगाने चालणे महत्त्वाचे आहे.