शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

डॉक्टरांवरील हल्ले, डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब : शिवकुमार उत्तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:19 PM

डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करणे सहज शक्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे ‘डॉक्टर-रुग्ण’ बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआयएमएतर्फे ‘डॉक्टर्स डे’ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करणे सहज शक्य आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे ‘डॉक्टर-रुग्ण’ बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेद्वारे सोमवारी ‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘डॉक्टरांवरील वाढते हल्ले’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याच कार्यक्रमात वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव होते. मंचावर आयएमए अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व सचिव डॉ. मंजुषा गिरी उपस्थित होत्या. संचालन डॉ. अनिरुद्ध देवके व डॉ. अर्चना देशपांडे यांनी केले.कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध नाहीतवैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा असा समज आहे की, सर्व कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध आहेत, मात्र वस्तुस्थिती अशी नाही. त्यामुळे जर डॉक्टरांनी चुकीचे काही केले नसेल तर तक्रारीस घाबरण्याचे काहीएक कारण नाही, असेही सांगत डॉ. उत्तुरे यांनी डॉक्टर व रुग्णांकडून कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्याचेही सांगितले.कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ता यांना सन्मानित करण्यात आले. यात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अरुण आमले, डॉ. नूतन देव, डॉ. जीवन वेदी, डॉ. अमित समर्थ, डॉ. काजल मित्रा, डॉ. दिवाकर भोयर, नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पत्रकार आनंद कस्तुरे व सामाजिक कार्यकर्ता मधुभाऊ बारापत्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाºया आयएमए सदस्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी व्हावीत-डॉ. कोल्हेएखाद्या संस्थेत उमेदीची २० ते २५ वर्षे दिल्यानंतर नाईलाजस्तव त्यास संस्था सोडावी लागते. हे मी इंटर्नशीपदरम्यान ३७ संस्थांच्या अभ्यासावरून सांगतो. त्यामुळे संस्था मोठी झाली तरी ती व्यक्ती मात्र संपून जाते. संस्थांना मूर्तरूप देणारी माणसे मोठी होणे आवश्यक असते. म्हणूनच कुठलीही संस्था स्थापित न करता स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला, असे मत पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने डॉ. प्रकाश देव व डॉ. संजय देशपांडे यांनी डॉ. कोल्हेंची मुलाखत घेतली. यावेळी ते मनमोकळेपणाने बोलत होते.डॉ. स्मिता कोल्हेंचे सेवाकार्यात हातभार, या प्रश्नावर डॉ. कोल्हे म्हणाले की, स्मिताने वकिलीचा अभ्यास केला आहे, शिवाय ती होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तिने रोजगार, वीज, रस्ता, पाणी, शिक्षण हे सगळे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. केवळ तिच्यामुळे आम्ही त्या भागातील प्रश्न सोडवू शकलो. स्मिता नसती तर मी केवळ वैद्यकीय सेवाच दिली असती, असे सांगत त्यांनी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या कार्यातील योगदान स्पष्ट केले. सेवाकार्यात समाजाचे नेहमीच पाठबळ मिळते, असेही सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर