लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासन कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. या अभियानात महत्त्वाचा वाटा आशा वर्करचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात व्यापक सर्वेक्षण होणार आहे. परंतु आशांनी अभियानाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. या अभियानात सहभागी करून घेण्यापूर्वी शासनाने आशांच्या काही मागण्या मान्य कराव्यात, यासाठी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. या अभियानाचे मानधन आशांना हवे आहे. परंतु शासन त्याबाबत बोलायला तयार नाही. सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आशांना मदत होत नाही. आशांवर जबरदस्ती व दबाव टाकून कामे लादली जात आहेत. सुरक्षा साधनांचा अभाव असून कार्यक्रम राबविण्यासाठी बहुतांश साहित्य अद्यापही दिले गेलेले नाहीत. गटप्रवर्तक टीमवर्कमध्ये सहभागी नसताना रिपोर्टिंगचे काम व सर्वेक्षणाचे काम दिले आहे. आशांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात संविधान चौकात काळ्या फिती लावून आंदोलन केले. शासनाने तातडीच्या या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास तीन दिवसीय लाक्षणिक संप २८ सप्टेंबरपासून करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व महासचिव प्रीीती मेश्राम, राजेंद्र साठे यांनी केले. आंदोलनात रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, नंदा लिखार, रुपलता बोंबले, अंजू चोपडे, मनीषा बारस्कर, मंदा गंधारे आदी उपस्थित होते.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ घेण्यास आशांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 1:33 AM
महाराष्ट्र शासन कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. या अभियानात महत्त्वाचा वाटा आशा वर्करचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात व्यापक सर्वेक्षण होणार आहे. परंतु आशांनी अभियानाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
ठळक मुद्देसंविधान चौकात केले आंदोलन