लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या या काळात मीटर रीडिंग बंद आहे. बिलसुद्धा वाटण्यात येणार नाही. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये वीज बिलाबाबत अनेक चिंता आहेत. लॉकडाऊन संपल्यावर एकाच वेळी भरभक्कम वीज बिल येऊ शकते, अशी नागरिकांना चिंता सतावत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने नागरिकांना स्वत:च मीटर रीडिंग पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली असून, यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरची आवश्यकताही रद्द केली आहे.महावितरणने मोबाईल अॅपच्या माध्यमातून हा दिलासा दिला आहे. नागरिक आपल्या मोबाईल फोनवर याला प्लेस्टोर करून डाऊनलोड करू शकतात. नागरिकांच्या सुविधेसाठी लोकमत या प्रक्रियेवर प्रकाश टाकत आहे. यासाठी आता ग्राहकांसाठी नोंदणी करणे आवश्यक नाही. ते गेस्ट म्हणून आपल्या मीटरचे रीडिंग सबमिट करू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर नोंदणीकृत आहेत त्यांना ओटीपी पाठवण्यात येईल. रीडिंग देण्यासाठी आता ग्राहकांना सबमिट रीडिंगच्या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल. केडब्ल्यूएचच्या जागेवर मीटरवर दिसत असलेले रीडिंग लिहून सबमिट करायचे आहे. यासोबतच ही प्रक्रिया पूर्ण होईल. जर या प्रक्रियेत काही अडचण आली तर त्याच्या निवारणासाठी ग्राहक टोल फ्री क्रमांक १९१२ वर संपर्क करू शकतात.केव्हा पाठवायचे आहे रीडिंगज्या ग्रहकांचे मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणीकृत आहेत त्यांना कंपनीकडून मॅसेज पाठवून याबाबत माहिती दिली जाईल की रीडिंग केव्हा पाठवायचे आहे. सध्या ज्यांचे मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही त्यांना ही सुविधा मिळणार नाही. महावितरणने ग्राहकांना या सुविधेसाठी आपला मोबाईल नंबर नोंदणीकृत करून घेण्याचे आवाहन केले आहे.
स्वत: मीटर रीडिंगसाठी आता नोंदणीकृत मोबाईल नंबरची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:36 AM
महावितरणने नागरिकांना स्वत:च मीटर रीडिंग पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली असून, यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरची आवश्यकताही रद्द केली आहे.
ठळक मुद्देमहावितरणने मोबाईल अॅपला बनविले सुविधाजनक