नागपूर : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात २१ सप्टेबरपासून अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असूनही दखल न झाल्याने संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे.संघटनेने दिलेल्या पत्रानुसार, मागील ४ वर्षापासून या विभागातील पदोन्नत्या रखडल्या आहेत. त्या त्वरित केल्या जाव्या, त्या शिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू करू नये, विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरावी, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याची मदत द्यावी, वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत समाविष्ट करावे,
आदींसह २१ मागण्यांसाठी २१ सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यानुसार, मंगळवारपासून या संपाला सुरूवात झाली आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती खालावल्याने कामकाजावर चांगलाच परिणाम जाणवला.