शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

प्राणी, पक्ष्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना नाेंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:07 AM

निशांत वानखेडे नागपूर : पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचे दुकान चालविणाऱ्यांना आता नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एवढेच नाही ...

निशांत वानखेडे

नागपूर : पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचे दुकान चालविणाऱ्यांना आता नाेंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एवढेच नाही तर घरीही एखादा प्राणी किंवा पक्षी पाळला असेल त्याचीही नाेंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तशी नाेंदणी केली नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पशुकल्याण आयुक्त कार्यालयाद्वारे त्यासाठी शाेधमाेहिम सुरू करण्यात आली आहे.

पाळीव प्राणी व पक्ष्यांचा अवैध व्यापार राेखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी कायदेशीर नाेंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कायदा २०१८ मध्ये पारित करण्यात आला व ६० दिवसाच्या आत प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकारे पेट शाॅपची नाेंदणी अनिवार्य करण्यात आली हाेती. मात्र जनजागृती अभावी आणि पुढे काेराेनामुळे ही प्रक्रिया रखडली. नाेंदणी आणि कारवाईचे अधिकार पशुकल्याण आयुक्त कार्यालयाला देण्यात आले आहे.

नागपूरच्या पशुकल्याण उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतीच शहरातील पेट शाॅप चालकांची बैठक बाेलावून त्यांना कायद्यातील तरतुदींबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांना नाेंदणी करण्याची अनिवार्यता समजावून सांगितली. त्यामुळे अवैध दुकाने चालविणाऱ्यांना व ब्रिडर्सना आळा बसणार आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चालकांची नाेंदणी झाल्यानंतर अवैध दुकाने चालविणाऱ्यांसाठी शाेधमाेहिम सुरू करून कारवाई करण्याचा इशारा उपायुक्तांनी दिला. यासाठी तयार करण्यात आलेल्या पशुकल्याण समितीवर जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग असून त्यांच्या आदेशानंतर नाेंदणी व कारवाई अभियान चालविण्यात येणार असल्याचे मंजुषा पुंडलिक यांनी स्पष्ट केले.

पावणेदाेनशे अधिकृत विक्रेता

मंजुषा पुंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरात जवळपास १७५ पेट शाॅप चालक आणि विदेशी श्वानांची ब्रिडिंग करणाऱ्या ५० च्या आसपास व्यावसायिकांची संख्या आहे. याशिवाय अनेक अनधिकृत दुकानदार आहेत आणि घरातून बेकायदेशीरपणे पाळीव प्राणी, पक्ष्यांची विक्री करणारेही भरपूर आहेत. ज्यांनी अधिकृतपणे नाेंदणी केली, त्यांना तात्पुरती परवानगी देऊन त्यांची माहिती राज्य पशुकल्याण मंडळाकडे पाठविली जाईल. त्यानंतर दुकानदारांच्या दुकानांची तपासणी करून व्यवसाय करण्याचे लायसन्स देण्यात येईल. ज्यांनी नाेंद केली नाही त्यांना शाेधून कारवाई करण्यात येईल.

मार्गदर्शक तत्त्वे

- हे दुकानदार वस्तूची विक्री करीत नाही तर जिवंत प्राणी व पक्ष्यांची विक्री करीत आहेत, ही गाेष्ट लक्षात घ्यावी लागेल.

- प्राणी किंवा पक्षी ठेवले आहेत, तिथे त्यांच्या हालचालीसाठी पुरेशी जागा असावी.

- त्यांच्यासाठी व्हेन्टिलेशनची, याेग्य अन्न, पाण्याची व्यवस्था आहे की नाही हे तपासणे.

- ब्रिडिंग करणाऱ्यांकडे शास्त्रीय प्रक्रियेची अंमलबजावणी हाेते की नाही?

या नाेंदणी प्रक्रियेमुळे श्वान व इतर पाळीव प्राणी, पक्ष्यांच्या बेकायदेशीर विक्रीला आणि ब्रिडिंगला आळा बसेल. शिवाय प्राणी, पक्ष्यांवर हाेणारे अत्याचार थांबविता येईल. आतापर्यंत अवैध विक्री व ब्रिडिंगचा प्रकार दृष्टीस येत हाेता पण आता कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागणार असल्याने कारवाई करणे साेपे हाेईल.

- मंजुषा पुंडलिक, पशुकल्याण उपायुक्त, जिल्हा पशुकल्याण मंडळ