लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा सहनिबंधक कार्यालयातर्फे स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्यात आली असून, मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता नागपूर शहरातील दुय्यम सहायक निबंधक नागपूर शहर क्रमांक १ व ४ या कार्यालयातील स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी पूर्ववत सुरू झाली आहे. तथापि शहरातील कंटेनमेंट एरियामधील कुणीही रहिवासी असल्यास त्यांनी या एरियामधून बाहेर पडू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.ग्रामीण भागातील सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरूसह जिल्हा दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यातील कार्यालये सुरू करण्यात आली असून, स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री पूर्ववत सुरू करून ऑनलाईन नोंदणी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. खरेदी विक्रीचे व्यवहार करताना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्स्ािंग तत्त्व पाळणे आवश्यक आहे.नागपूर ग्रामीण सह जिल्हा निबंधक कार्यालयांतर्गत दुय्यम निबंधक हिंगणा, कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी, कुही, काटोल, कळमेश्वर, नरखेड, उमरेड, भिवापूर व सावनेर या कार्यालयात स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी पूर्ववत सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर यांनी दिली आहे.