मौदा : गत वर्षभरापासून तालुक्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहेत. कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरुळीत करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन तालुक्यातील निमखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ यांना दिले.
वीजेचे बिल मिळण्याच्या आधीच वीज कनेक्शन कापले जावू नये, कृषी पंपाचे रिडींग न घेता अवाढव्य बिल पाठवणे बंद करावे, वीज बिल भरून सुद्धा पुरवठा खंडीत करणे बंद करावे, नवीन ११ केव्हीची लाईन सुरु करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शेतकरी सुरेश सज्जा, पांडुरंग येळने, श्रीकांत चिलकुटी, श्रीनिवास कुंटा, मल्लीकार्जून जागरलामुडी, राजेश अलोनी, दिनेश गुरनुले, कृष्णा पोटभरे, कोटेश्वर चिलकुरी, धनराज मेहर आदी शेतकऱ्यांचा समावेश होता.