कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी आयोजित विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवासाठी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. विमानात अडवाणी यांना दुसºया रांगेतील सीट मिळाली होती. विमानात उपस्थित भाजप पदाधिकाºयाने पहिल्या रांगेतील सीटवर बसलेल्या प्रवाशाला अडवाणी यांना सीट देण्याची विनंती केली. मात्र, संबंधित प्रवाशाने नकार देताच अडवाणी यांनी पदाधिकाºयाला रोखले व मनाचा मोठेपणा दाखवत आपल्याच मागच्या सीटवर बसले.दिल्ली येथून अडवाणी यांचे रात्री ९.३० वाजता इंडिगोच्या विमानाने नागपुरात आगमन झाले. अडवाणी यांना दुसºया रांगेतील सीट मिळाली होती. दिल्लीत ते विमानात चढले व आपल्याच सीटवर जाऊन बसले. याच विमानात भाजपाच्या नगरसेविका रुपा राय या देखील होत्या. अडवाणी दुसºया रांगेत बसल्याचे पाहून त्या समोर गेल्या व त्यांनी पहिल्या रांगेच बसलेल्या प्रवाशाला अडवाणी यांना समोर बसू देण्याची विनंती केली. मात्र, संबंधित प्रवासी त्यासाठी इच्छुक नव्हता. हे पाहून अडवाणी यांनी स्वत:च राय यांना थांबविले. मी माझ्याच जागेवर बसतो. मला काहीच त्रास होणार नाही, आपल्यामुळे कुणाला त्रास नको, असे म्हणत अडवाणी आपल्याच जागेवर बसले.अडवाणी हे देशाचे उपपंतप्रधान होते. त्यांना संपूर्ण देश ओळखतो. या एवढ्या मोठ्या नेत्याने मनाचा मोठेपणा दाखवित स्वत:च्याच जागेवर बसणे पसंत केले. मात्र, संबंधित प्रवाशानेही तेवढाच मनाचा मोठेपणा व आपल्यातील सुसंस्कृतपणा दाखवून अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपली पहिल्या रांगेतील सीट द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया हा प्रकार पाहणाºया प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.विमानतळावर भाजपा तसेच संघ पदाधिकाºयांनी अडवाणी यांचे स्वागत केले. भाजपाचे खासदार अजय संचेती, शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, रवींद्र बोकारे, प्रसाद महानकर, भाजपा नेते जयप्रकाश गुप्ता, प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडवाणी यांचे स्वागत केले. यानंतर अडवाणी वर्धमान नगर येथे चंद्रकांतभाई ठक्कर यांच्या निवासस्थानी मुक्कामासाठी रवाना झाले.भाजपातर्फे मोदी यांची निवडणूक प्रचार प्रमुखपदी झालेल्या निवडीनंतर नाराज झालेल्या अडवाणींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ५ जुलै २०१३ रोजी त्यांनी नागपुरात येऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली होती.
विमान प्रवाशाचा नकार - अडवाणी बसले मागच्या सीटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:42 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी आयोजित विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवासाठी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले.
ठळक मुद्देसंघाच्या सोहळ्यासाठी दाखल : भाजपा, संघाकडून स्वागत