लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सातत्याने तीन दिवस रुग्णसंख्या वाढीस लागल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु बुधवारी जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या दहाच्या खाली आहे. जिल्ह्यात एकूण सहा नवे बाधित नोंदविण्यात आले. यात शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश होता. दरम्यान, बुधवारी चाचण्यांची संख्यादेखील खालावल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील दोन वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद होताच मंगळवारी खळबळ उडाली होती. बुधवारी आकडा आणखी वाढतो की काय, अशी भीती व्यक्त होत होती. परंतु प्रत्यक्षात बुधवारी ३ हजार चाचण्या झाल्या. यात शहरातील २ हजार ४८२ व ग्रामीणमधील ५१८ चाचण्यांचा समावेश होता. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ९३ हजार ९६ इतकी झाली आहे. यात शहरातील ३ लाख ४० हजार १२९ तर ग्रामीणधील १ लाख ४६ हजार १४२ रुग्णांचा समावेश आहे. मृतांची संख्या १० हजार ११९ वर स्थिर आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये ६६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४६ शहरातील व १६ ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ५३ जण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील पाच रुग्ण ठीक झाले.
सप्टेंबरमधील रुग्ण
तारीख : रुग्ण
१ सप्टेंबर : ०६
२ सप्टेंबर : ०६
३ सप्टेंबर :०१
४ सप्टेंबर : ०७
५ सप्टेंबर : १०
६ सप्टेंबर : १२
७ सप्टेंबर :१८
८ सप्टेंबर : ०६
कोरोनाची बुधवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ३,०००
शहर : २ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,९३,०९६
एकूण सक्रिय रुग्ण : ६६
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,९११
एकूण मृत्यू : १०,११९