शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

नागपूरकरांना दिलासा : मालमत्ताकरात कोणतीही वाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 9:10 PM

महापालिका २०२०-२१ या वित्त वर्षात मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची करवाढ करणार नाही. सन २०१९-२० या वर्षातील प्रचलित दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देकर आकारणी जुन्याच दराने : स्थायी समितीची प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका २०२०-२१ या वित्त वर्षात मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची करवाढ करणार नाही. सन २०१९-२० या वर्षातील प्रचलित दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १२६(अ)अंतर्गत मालमत्ता करात समाविष्ट असलेले कर कलम ९९ अंतर्गत पुढील आर्थिक वर्षात महानगरपालिके द्वारे आकारण्यात येणाऱ्या कर आकारणीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. सन २०१९-२० या वर्षात सामान्य कर, साफसफाई, शिक्षण कर, विशेष सफाई पाणीपुरवठा, विशेष सफाई रोजगार हमी कर, रस्ते, दिवाबत्ती, अग्निशमन, वृक्ष कर अशा स्वरूपाची कर आकारणी ज्या दराने करण्यात आली होती, त्यानुसार पुढील वर्षात कर आकारणी केली जाणार आहे.या प्रस्तावाला २० फेब्रुवारी २०२० पर्यंत महापालिका सभागृहाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रस्तावात राज्य शासनाच्या शिक्षण कर, रोजगार हमी कर व मोठ्या निवासी इमारतींवरील करांच्या दरामध्येसुद्धा शासनातर्फे कोणत्याही स्वरूपाचा बदल केलेला नाही. पुढील आर्थिक वर्षात कोणत्याही स्वरूपाची वाढ प्रस्तावित केलेली नाही. करात कोणत्याही स्वरूपाची करवाढ प्रस्तावित नसल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.स्थायी समितीतून आठ सदस्य निवृत्तमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २०(३)अन्वये स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कालावधी १ मार्च २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांत लखन येरवार, विजय चुटेले, श्रद्धा पाठक, वर्षा ठाकरे, स्नेहल बिहारे, निरंजना पाटील, जिशानमुमताज मों. इरफान अन्सारी आदींचा समावेश आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची सभागृहात नियुक्ती केली जाणार आहे. या प्रस्तावाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.फायरमन ड्रायव्हरला मुदतवाढमहापालिकेच्या अग्निशमन विभागातील निवृत्त झालेल्या कंत्राटी १३ फायरमन ड्रायव्हरला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अग्निशमन विभागात मनुष्यबळ कमी असल्याने नवीन भरती प्रक्रिया होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने स्यायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर