शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

नागपूर महापालिकेत ‘धर्म’ संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:47 PM

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटिवण्याच्या मुद्यावरून महापालिका प्रशासनाची दमछाक सुरू आहे. त्यातच मागील २५ वर्षांपासून रखडलेल्या धंतोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी महापालिका कार्यालयापुढे निदर्शने क रण्यात आली. शिवसेनेतर्फे शहरातील अनधिकृत मंदिर हटविण्याच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. तर शहरात डास वाढल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी काँग्रेसतर्फे सभागृहात व सभागृहाबाहेर मच्छरदाणी झळकावत आंदोलन करण्यात आल्याने महापालिकेत ‘धर्म’संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीची स्मारकासाठी निदर्शने : शिवसेनेची मंदिरासाठी : काँग्रेसचे डासांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटिवण्याच्या मुद्यावरून महापालिका प्रशासनाची दमछाक सुरू आहे. त्यातच मागील २५ वर्षांपासून रखडलेल्या धंतोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी महापालिका कार्यालयापुढे निदर्शने क रण्यात आली. शिवसेनेतर्फे शहरातील अनधिकृत मंदिर हटविण्याच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. तर शहरात डास वाढल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी काँग्रेसतर्फे सभागृहात व सभागृहाबाहेर मच्छरदाणी झळकावत आंदोलन करण्यात आल्याने महापालिकेत ‘धर्म’संकट निर्माण झाले आहे.राष्ट्रवादीची स्मारकांसाठी निदर्शनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी महापालिकेने २७८० चौ.मी. जागा प्रस्तावित केली होती. मात्र ही जागा स्मारकाला कमी पडत असल्याने धंतोली येथील खसरा क्र. ५/३, ६/७ मधील संपूर्ण १३.५६ एकर जागा जन्मशताब्दी स्मारक उभारण्यात यावे. याबाबतचा ठराव महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात यावा, यासाठी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी र्कांग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.गेल्या २५ वर्षांपासून स्मारकाचे काम रखडले आहे. या स्मारकासंदर्भात प्रकाश गजभिये यांनी विधान परिषदेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले. विविध मार्गांनी त्यांनी हा प्रश्न लावून धरला. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात बैठक बोलावून अधिकाऱ्यांना निर्देशही दिले होते, मात्र त्यानंतरही स्मारकाचे काम रखडले. शिष्टमंडळातर्फे स्मारक ाला संपूर्ण जागा उपलब्ध करण्याबाबतचे निवेदन महापौर नंदा जिचकार यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजू नागुलवार, राजाभाऊ आकरे, किसान सेलचे राजू राऊ त, सामाजिक न्याय विभागाचे संतोष नरवाडे, शहराध्यक्ष महेंद्र भांगे, युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रुद्र धाकडे, प्रमोद थूल, विजय गजभिये, प्रदेश उपाध्यक्ष वर्षा श्यामकुळे, उर्वशी गिरडकर, प्रमिला टेेंभेकर, अमोल वासनिक, प्रशिक घुटके, दीप पंचभावे, राजेश अघव, प्रणय जांधूळकर, सावन मून यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.काँग्रेसतर्फे महापौरांना मच्छरदाणी भेटमहापालिका स्मार्ट सिटी प्रकल्प राबवित असतानाच रेशीमबागसह शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शहर डासांच्या विळख्यात आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाही. घाणीमुळे विविध आजार वाढले आहेत. याकडे महापालिका प्रशासन व पदाधिकाºयांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात मच्छरदाणी घेऊन नारेबाजी केली. तसेच मच्छरदाणी महापौरांना भेट दिली. सभागृहाबाहेरही आंदोलन केले. डास वाढल्यानंतरही महापालिकेच्या मलेरिया व फायलेरिया विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नारेबाजी केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बंटी शेळके, नगरसेवक दुनेश्वर पेठे, संदीप सहारे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, नगरसेवक हरीश ग्वालबंशी, हर्षला साबळे, जुल्फिकार भुट्टो,किशोर जिचकार, रमेश पुणेकर, परसराम मानवतकर, दिनेश यादव, स्नेहा विवेक निकोसे, आयशा उईके, जीशान मुमताज, सैयदा बेगम निजाम अंसारी, प्रणीता शहाणे, दर्शनी धवड, रश्मी धुर्वे, कमलेश चौधरी, नेहा राकेश निकोसे, नितीन साठवणे, उज्ज्वला बनकर, भावना लोणारे, साक्षी राऊ त आदींचा सहभाग होता. तसेच सभागृहाबाहेर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.शिवसेनेची समाजभवनासाठी निदर्शनेउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्र प्रशासने शहराती अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात महापालिक ा व शासन निधीतून उभारण्यात आलेल्या समाजभवनांचाही समावेश आहे. महापालिकेने चुकीची माहिती सादर केल्याने न्यायालयाने सरसकट अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचा आदेश दिला आहे. ही कारवाई अन्यायकारक आहे. समाजभवन या यादीतून वगळण्यात यावे. यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात सोमवारी महापालिका सभागृहाबाहेर निदर्शने करण्यात आली. तसेच महापौर नंदा जिचकार यांना मागण्याचे निवेदन दिले.नागपूर शहरातील १५०४ धार्मिक स्थळे व ७०० समाजभवानांचा अनधिकृत स्थळात समावेश करण्यात आला आहे. समाजभवन यातून वगळण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. आंदोलनात माजी नगरसेवक बंडू तळवेकर, नगरसेवक किशोर कुमेरिया, रमेश मिश्रा, अलका दलाल, किशोर ठाकरे, किशोर पराते, गौतम पाल यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाagitationआंदोलन