नागपूर : 下रेमडेसेवीर载 इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध असून, विदर्भात 下हे载 इंजेक्शन सर्वत्र उपलब्ध आहे. 下सीपला载 कंपनीचे जवळपास ७ हजार 下५००载 下वायल्स载 उपलब्ध असून 下या载 आठवड्यात 下१५载 हजार 下वायल्सचा载 पुरवठा होणार आहे. 下आतापर्यत载 २ लाख 下८२载 हजार 下वायल्सचे载 वितरण कंपनीमार्फत विदर्भ व इतर विभागात करण्यात आले आहे. यापैकी नागपूर शहरात सुमारे 下५०载 हजार 下वायल्सची载 विक्री झाली आहे. हेटेरो कंपनीचे ४ हजार 下८००载 下वायल्स载 下आज载 नव्याने प्राप्त झाल्यामुळे विक्रीसाठी ८ हजार 500 उपलब्ध आहेत. 下या载 कंपनीचे आजपर्यंत 75 हजार 下वायल्सची载 विक्री नागपूर जिल्ह्यात झाली आहे. एकूणच दोन्ही कंपन्यांचे मिळून सध्याच्या स्थितीत 下१६载 हजारांवर 下वायल्स载 उपलब्ध आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त 下डॉ.载 下पी.载 下एम.载 बल्लाळ यांनी मंगळवारी दिली.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला घेऊन ‘लोकमत’ने रेमडेसेवीर इंजेक्शनची माहिती जिल्हा माहिती कार्यालयात मागितली असता ही माहिती दिली. डॉ. बल्लाळ यांनी सांगितले, नागपूर विभागात प्रामुख्याने मायलॉन, सीपला, हेटेरो, डॉ. रेड्डी या उत्पादकांचे रेमडेसेवीर इंजेक्शनचा साठा व विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कंपनींच्या डेपोमधून नागपूर जिल्हा व इतर संलग्नित जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाडा व शेजारच्या राज्यात देखील वितरण व विक्रीची व्यवस्था आहे. कोविड संसर्गाच्या काळात अन्न व औषध प्रशासनातर्फे या इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. या औषधाच्या उपलब्धतेच्यासंदभार्तील माहिती अपलोड करणे कंपनीला बंधनकारक केले आहे. यासाठी औषध निरीक्षक स्वाती भरडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मायलॉन कंपनीच्या गोडाऊनमध्ये विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगडसाठी ९७ हजार ५०० वायल्सचा साठा आहे. जेथे जास्त आवश्यकता भासेल तेथे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय रुग्णालयांना रेमडिसिव्हीरचे वितरण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत असून खाजगी कोविड हॉस्पिटल्स यांना विविध कंपन्यांच्या वितरण व्यवस्थेमार्फत इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येतो. *****