शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रेमडेसिविरचा काळाबाजार, एक्स-रे तंत्रज्ञांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:09 AM

नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एक्स-रे तंत्रज्ञ तरुणांना सक्करदरा पाेलिसांनी रंगेहाथ अटक केली. पाच दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराचे ...

नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एक्स-रे तंत्रज्ञ तरुणांना सक्करदरा पाेलिसांनी रंगेहाथ अटक केली. पाच दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराचे हे चाैथे प्रकरण आहे. न्यू सुभेदार ले-आऊट निवासी अभिलाष देवराव पेठकर (२८) आणि तुकडाेजी चाैक, मानेवाडा निवासी अनिकेत माेरेश्वर नंदेश्वर (२१) अशी आराेपींची नावे आहेत.

अभिलाष व अनिकेत एक्स-रे टेक्निशियन आहेत. दाेघेही काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत हाेते. मंगळवारी सायंकाळी सक्करदरास्थित मिरची बाजारात गरजू ग्राहकांच्या शाेधात हाेते. त्यांचे एका गरजवंताशी बाेलणेही झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनी एका इंजेक्शनची किंमत २८ हजार रुपये ठरविली हाेती. याबाबत किंग काेब्रा ऑर्गनायझेशनचे प्रमुख अरविंदकुमार रतुडी यांना माहिती मिळाली. ते त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाेहचले व आराेपींना घेरले. त्यानंतर पाेलिसांना सूचित करण्यात आले. सक्करदराचे पाेलीस निरीक्षक सत्यवान मानेही तत्काळ टीमसह पाेहचले. पाेलिसांनी आराेपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दाेन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले. पाेलिसांनी याबाबत एफडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. पाच दिवसांत पाेलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराची चार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. आतापर्यंत वाॅर्डबाॅय, मेडिकल स्टाेअर्स कर्मचारी व दाेन वितरकांना अटक करण्यात आली आहे. पहिल्यांदा एक्स-रे तंत्रज्ञ सापडले आहेत. आराेपींकडून जप्त केलेली इंजेक्शन बनावट असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पाेलीस आराेपींची चाैकशी करीत हाेते.

नाकाबंदीमध्ये मिळाले १२ पाॅझिटिव्ह

नागपूर : पाेलिसांच्या नाकाबंदीदरम्यान मंगळवारी रस्त्यावर करण्यात आलेल्या अँटिजन टेस्टमध्ये १२ लाेक पाॅझिटिव्ह आढळून आले. शनिवारपासून शहरात ही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ५४ लाेक पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी पाेलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २३८ लाेकांची अँटिजन टेस्ट केली. यामधून १२ लाेक संक्रमित असल्याचे आढळून आले. त्या सर्वांना तत्काळ १४ दिवसांसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. याशिवाय मास्क न वापरणाऱ्या १५८ आणि शारीरिक अंतर पालनाचे उल्लंघन करणाऱ्या ४६७ लाेकांच्या विराेधात कारवाई करण्यात आली. १७६ वाहने जप्त करण्यात आली.

अल्पवयीन बाईकस्वाराचा मृत्यू

नागपूर : एका अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. माजरी निवासी साेनू बबलू शेख (१६) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दुचाकी घेऊन उप्पलवाडी परिसरातून जात हाेता. त्याची दूध वाटून येणारे दुचाकीस्वार गुंडेराव देऊडकर यांच्या वाहनाशी धडक झाली. यामध्ये साेनू गंभीर जखमी झाला. कामठी रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घाेषित करण्यात आले. कपिलनगर पाेलिसांनी अपघाताचे प्रकरण दाखल केले आहे.