शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निवडणुका आल्यामुळेच राममंदिराची आठवण : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 8:34 PM

तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मिळविता येत नाही. जनतेला सत्य माहीत झाले आहे. निवडणुका आल्यामुळेच भाजपाने आपल्या चुका लपविण्यासाठी राममंदिराचा मुद्दा समोर केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपुरातील दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला दीक्षाभूमीहून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मिळविता येत नाही. जनतेला सत्य माहीत झाले आहे. निवडणुका आल्यामुळेच भाजपाने आपल्या चुका लपविण्यासाठी राममंदिराचा मुद्दा समोर केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपुरातील दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. 

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभाग येथे जनसंघर्ष यात्रेचे चार टप्पे झाले. पाचव्या टप्प्याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गणेश टेकडी व ताजबाग येथेदेखील दर्शन घेण्यात आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नसीम खान, अनिस अहमद, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा प्रामुख्याने उपस्थित होते. 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय हेतूने सवर्ण आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. मात्र जनतेने मागील साडेचार वर्षांत बराच त्रास भोगला आहे. त्यामुळे सवर्ण आरक्षणाने केंद्राला निवडणुकांत फारसा फायदा होणार नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केंद्राकडून जुमलेबाजी सुरू आहे. सवर्ण आरक्षणामुळेदेखील केंद्राला निवडणुकांत फारसा फायदा होणार नाही. येत्या काही दिवसांत पंतप्रधानांची जुमलेबाजी वाढेल. राफेल प्रकरणातील अंतिम सत्य लवकरच समोर येईल, असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.यावेळी नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन, आशिष देशमुख, अनंत घारड, प्रदेश मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे, प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस रामकिशन ओझा, डॉ.बबन तायवाडे, अमोल देशमुख, प्रा.प्रकाश सोनावणे, श्याम उमाळकर, सचिव तौफिक मुल्लाणी, शाह आलम शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोदींच्या काळात जनतेची अधोगती : राधाकृष्ण विखे पाटीलतीन राज्यांत पराभव झाल्यामुळे सवर्ण आरक्षण, जीएसटीचे दर कमी करणे इत्यादी पावले केंद्र शासनाने उचलली. मात्र प्रत्यक्षात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी यांची अधोगतीच झाली आहे. सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठीच आम्ही जनसंघर्ष करत आहोत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा