नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने आसीनगर, धरमपेठ व गांधीबाग झोन अंतर्गत अतिक्रमण कारवाई केली. या कारवाई फुटपाथवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथवर पाटोडी विकणाऱ्यांना अतिक्रमण पथकाने हटविले. या कारवाई दरम्यान फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्याचे साहित्यही जप्त करण्यात आले.
आसीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या कमाल चौक ते इंदोरा चौक ते १० नंबर पुलिया ते आवळेबाबू चौक दरम्यान कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. धरमपेठ झोन मधील फ्रेंड्स कॉलनी ते हजारी पहाड, सेमिनरी हिल्स व जिल्हाधिकारी कार्यालयापुढील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आले.
फुटपाथवरील ठेले व दुकान हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत महाल परिसर ते बडकस चौक, सिद्धीविनायक मंदिर ते इतवारी पोस्ट ऑफीस व नंगा पुतळा पर्यंत कारवाई करण्यात आली. या भागातून मोठ्या प्रमाणात फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण विभागाचे सहा. आयुक्त हरिष राऊत व प्रवर्तन अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.