लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विद्युत पुरवठा करणाºया डीपीचे खुले दार धोकादायक ठरू शकतात, या आशयाच्या छायाचित्रासह वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत, शहराला विद्युत पुरवठा करणारी एसएनडीएल व महावितरण कंपनीने तात्काळ दखल घेतली असून, एनएनडीएलने ७२ तासात डीपीचे दार दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. तर महावितरण सुद्धा त्याच्या कक्षेतील उघड्या डीपी दुरुस्त करणार असून, शिवाय एनएनडीएलला कारवाईचा अहवाल मागविणार असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.शहरातील अनेक भागातील उघड्या डीपी, डीपीचे तुटलेले दार, विद्युत तारांवर लटकलेले केबलचे वायर, विद्युत खांबाला बांधलेले केबल आहे. विद्युत पुरवठ्याची ही व्यवस्था धोकादायक असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. यासंदर्भात एसएनडीएलचे जनसंपर्क अधिकारी दीपांशू खिरवाडकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, उघड्या पडलेल्या डीपी किंवा डीपीचे तुटलेले दार हा प्रकार भुरट्या चोरांचा आहे. परिसरातील नागरिकांकडूनही डीपीतून वीजचोरी होत असल्याने ते उघड्या डीपी ठेवतात. ज्या डीपी उघड्या आहेत, त्यांना ताबडतोब बंद करण्यात येईल. तसेच ज्या डीपीचे दार तुटलेले आहे, तेही येत्या ७२ तासांमध्ये बदलविण्यात येईल.यासंदर्भात महावितरण काय उपाययोजना करते, यासाठी त्यांच्या अधिकाºयांना विचारणा केली असता ते म्हणाले की, यात महावितरणच्या हद्दीत असलेल्या केवळ एकाच ठिकाणचे छायाचित्र आहे. या कामाचे वर्क आॅर्डर झालेले आहे. परंतु ठेकेदाराने ते काम केलेले नाही. लवकरात लवकर ते काम करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देण्यात येईल. तसेच इतर भागातील जे छायाचित्र आहे ते एनएनडीएलच्या हद्दीतील आहे. त्यामुळे एसएनडीएलला आम्ही पत्र पाठवून त्यांच्याकडून कामाचा अहवाल मागवू.नागरिकांसाठी हेल्पलाईनविद्युत डीपीच्या दाराची चोरी होण्याचे प्रकार थांबविण्यासाठी किंवा वीज पुरवठ्यासंदर्भातील काही समस्या असतील, यासाठी एसएनडीएलने हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांना ७५०७७७४६११ हा व्हॉटस्अॅप नंबर दिला आहे. त्यांनी समस्यांचे फोटो यावर टाकल्यास ताबडतोब आम्ही कारवाई करू. प्रत्येक डीपीवर आम्ही लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनीच सुरक्षेसंदर्भात पुढाकार घेतल्यास, या अडचणी बºयापैकी संपविता येईल, असेही एसएनडीएलच्या जनसंपर्क अधिकाºयानी सांगितले.
डीपीचे दार दुरुस्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:32 AM
शहरातील विद्युत पुरवठा करणाºया डीपीचे खुले दार धोकादायक ठरू शकतात, या आशयाच्या छायाचित्रासह वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले.
ठळक मुद्देएसएनडीएलने मागितला ७२ तासांचा अवधी : महावितरणनेही घेतली दखल