आॅनलाईन लोकमतनागपूर- नागपुरातील कामठी रोड गुरुद्वाराजवळ असलेल्या रेल्वे पुलाच्या डाऊन लाईनचे स्टील गर्डर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे मध्य रेल्वेचे नागपूर हे मोठे व मह्त्त्वाचे जंक्शन असून येथून दररोज शेकडो गाड्या धावतात.ज्या पुलावर ही फट पडली आहे त्या पुलावरून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचा वाहता ओघ असतो. तसेच या पुलाखाली एक मोठा गुरुद्वारा असून तेथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. अशा परिस्थितीत या पुलाला दोन इंचाची फट पडण्याची गंभीर बाब रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने संभाव्य अनेक धोके टळल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.शनिवार दुपारपासूनच पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाला कठड्याचा आधार दिला गेला असून, २ इंचाची फट ज्या ठिकाणी आली आहे ती दुरुस्त करून पुढील २ दिवस त्याच्या देखरेखीचे काम केले जाणार आहे.या कामाच्या पाहणीसाठी मुंबई मध्य रेल्वेचे काही अधिकारीही येथे दाखल होणार आहेत. सध्या नागपूर-इटारसी डाऊन लाईनवरील वाहतूकही वळविण्यात आली आहे. नागपूर स्टेशन ते गोधनी स्टेशनदरम्यान सिंगल लाईन राहणार असल्याने इटारसी लाईनच्या गाड्या विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.
नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 4:31 PM
आॅनलाईन लोकमतनागपूर- नागपुरातील कामठी रोड गुरुद्वाराजवळ असलेल्या रेल्वे पुलाच्या डाऊन लाईनचे स्टील गर्डर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे मध्य रेल्वेचे नागपूर हे मोठे व मह्त्त्वाचे जंक्शन असून येथून दररोज शेकडो गाड्या धावतात.ज्या पुलावर ही फट पडली आहे त्या पुलावरून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचा वाहता ...
ठळक मुद्देतपासणीदरम्यान पुलाला आढळली होती दोन इंचाची फट