सावनेर : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा-महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालयात ध्वजाराेहण करण्यात आले. नगर परिषद कार्यालय येथे नगराध्यक्ष रेखा मोवाडे यांनी ध्वजाराेहण केले. पोलीस स्टेशन येथे ठाणेदार अशोक कोळी यांनी ध्वजाराेहण केले. शहरातील जयस्तंभ बाजार चौक येथे शहर काँग्रेसचे अध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या हस्ते सचिव विजय बसवार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता न. प. हायस्कूलच्या प्रांगणात आयाेजित मुख्य साेहळ्यात उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार चैताली दराडे, दुय्यम निबंधक किशोर बन्सोड, नायब तहसीलदार गजानन जवादे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते. यावेळी पोलीस पथक, होमगार्ड जवान व एनसीसी पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमात पाेलीस, आराेग्य विभाग, नगरपालिका सफाई कामगारांना काेराेना याेद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र उबाळे यांनी केले. अमाेल देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नगरसेवक सुनील चाफेकर, दीपक बसवार, नीलेश पटे, शफीक सय्यद, माजी नगरसेवक, लक्ष्मीकांत दिवटे, शैलेश जैन, गोपाल घटे, प्रा. अश्विन कारोकार, दिलीप घटे, मुकुंदा नाईक, विनोद डहाके, सादिक शेख, इमरान शेख, रवी काळबांडे, सुजित आढे, अनिल भोसले आदींसह नागरिक उपस्थित हाेते. पाणीपुरवठा विभाग येथे नगरपालिकेचे उपाध्यक्ष ॲड. अरविंद लोधी यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष रेखा मोवाडे, भाजप नेते रामराव मोवाडे तसेच नगरसेवक, न.प. कर्मचारी उपस्थित हाेते.
सावनेर येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:40 AM