रामटेक : शहरात प्रजासत्ताकदिन साध्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. गांधी चाैक येथे माजी आमदार आनंदराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. प्रशासनातर्फे मुख्य साेहळा नेहरू मैदानावर पार पडला. उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी पाेलीस, हाेमगार्ड, एनसीसी पथकाने मानवंदना दिली. कार्यक्रमात आराेग्य, महसूल व नगरपालिका कर्मचाऱ्यांना काेराेना याेद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गाैरविण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब मस्के, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, गटविकास अधिकारी बम्हनाेटे, तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने, माजी आमदार डी. एम. रेड्डी, ठाणेदार मकेश्वर तसेच सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित हाेते.
ग्रामपंचायत शीतलवाडी
रामटेक : शीतलवाडी ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच मदन सावरकर यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी हरित शपथ घेण्यात आली व प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. यावेळी उपसरपंच विनोद सावरकर, ग्रा.पं. सदस्य अजय चौधरी, आशिषकुमार भोगे, नितीन कापसे, प्रवीण बालमवार, भारत वाघमारे, प्रार्थना ठाकरे, सुरेखा हिवसे, प्राजक्ता हुमणे, वंदना येनूरकार, अर्चना राऊत, गीता यादव, निर्मला कोडवते, प्रभा देवढगले, ग्रामविकास अधिकारी काशीनाथ गायकवाड, ग्रा.पं. कर्मचारी धनराज पालीवार, जितेंद्र बेले, अविनाश चन्ने, पौर्णिमा गेडाम, पार्वती सूर्यवंशी, पुरुषाेत्तम मोहनकर, प्रफुल डोंगरे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस, खैरी बिजेवाडाचे माजी सरपंच धर्मराज रहाटे, माजी पं.स. सदस्य हरिसिंग सरोते यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.