शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आरक्षणाच्या मागणीला रिपाइंचा नेहमीच पाठिंबा

By admin | Published: August 30, 2015 2:50 AM

सामाजिक पाया ढासळू नये : रामदास आठवले यांचे प्रतिपादन

नागपूर : सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजातर्फे होणाऱ्या आरक्षणाच्या मागणीला रिपाइंचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. त्याच धर्तीवर सध्या गुजरातमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेल्या पटेल समाजाला सुद्धा आमचा पाठिंबा आहे. परंतु आरक्षण देत असतांना सामाजिक पाया ढासळता कामा नये, याची काळजी सुद्धा शासनाने घ्यावी, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. रविभवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. खा. आठवले म्हणाले, पटेल समाजाचे नेतृत्व करीत असलेल्या हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र आम्हाला मिळाले नाही तर कुणालाच आरक्षण मिळू नये, ही त्यांची भाषा योग्य नाही. त्याला आमचा प्रखर विरोध राहील. त्यांनी संविधानाची भूमिका मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला. नुकतीच जनगणना जाहीर करण्यात आली असून त्यात बौद्धांची संख्या जी दाखविण्यात आली आहे, ती संख्या मुळात खूप जास्त आहे. लोकांमध्ये गैरसमज असल्याने बौद्ध म्हणून नोंद होत नाही. त्यामुळे बौद्धांची संख्या कमी दिसून येते. देशातील दलित आंबेडकरी लोकांनी स्वाभिमानाने बौद्ध म्हणून आपली नोंद करावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमी स्मारक समितीत काम करण्याच्या इच्छेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, दीक्षाभूमीच्या स्मारक समितीत काम करायला निश्चित आवडेल. परंतु या संदर्भात कुणाशीच चर्चा झालेली नाही. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांनी रिपाइंत प्रवेश केल्याचे खा. आठवले यांनी जाहीर केले. यावेळी रिपाइं (आ)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे, भीमराव बनसोड, दादाकांत धनविजय उपस्थित होते. (प्रतिनिधी)