शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती

By सुमेध वाघमार | Published: June 09, 2023 4:12 PM

परिवहन विभागाचे पत्र : नागपूर शहर व ग्रामीणमधील ११ जिल्ह्याचा कारभार सांभाळणार कोण?

नागपूर : अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण आरटीओचीही जबाबदारी दिल्याने उपमुख्यमंत्री व केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या शहराला अधिकारी मिळत नसल्याचे चित्र पुढे आले असताना आता परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना बदलीस पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागितली आहे. यामुळे नागपूर शहर व ग्रामीण आरटीओतील ११ जिल्हे सांभाळण्यासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. परिवहन विभागातील बदल्यांचा घोळ नवा नाही. पैसे घेऊन बदल्या होत असल्याचे अनेक घटना पुढे आल्या. आता याला फाटा देत परिवहन विभागाने ९ जून रोजी काढलेल्या पत्रात ३१ मे २०२३ अखेरीस ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची सेवा एकाच ठिकाणी बजावलेल्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा बदली पसंतीक्रम मागवून त्यांच्या अर्जांच्या मूळ प्रतिसह १६ जून २०२३पूर्वी सादर करण्याचे निर्देश सर्व आरटीओ कार्यालयांना दिले. यामुळे पुढील महिन्यांपर्यंत बदलींचे आदेश धडकण्याची शक्यता आहे.

- आरटीओ अधिकारी ४ वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी

अमरावती आरटीओचे गिते यांना एकाच ठिकाणी ६ वर्षे, ठाणे आरटीओचे रविंद्र गायकवाड,  पुणे आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे व नांदेड आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांना प्रत्येकी एकाच ठिकाणी ४ वर्षांचा कालावधी झाला आहे.

- ११ ‘डेप्युटी आरटीओ’ अधिकारी ३ वर्षांपासून एकाच ठिकाणी

राज्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, अकलुज, नांदेड, पआका, बोरीवली, पुणे, जालना, जळगाव, ठाणे व वाशिम आरटीओ कार्यालयातील ११ उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना (डेप्युटी आरटीओ) एकाच ठिकाणी सेवा देण्याला ३ ते ५ वर्षे झाली आहेत.

- ‘एआरटीओ’ अधिकाऱ्यांची ५ वर्षांपासून बदलीच नाही

वाशिम, नागपूर ग्रामीण, औरंगाबाद, जालना, लातूर व श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील ६ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाºयांची  (एआरटीओ) ५ वर्षांपासून बदल्याच झालेल्या नाहीत.

- आॅनलाइन बदल्या करण्याचा अद्याप ‘जीआर’ नाही

आरटीओमधील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या बदल्या ‘आॅनलाइन’ पद्धतीने करण्याचा अद्याप शासन निर्णय (जीआर) नाही. 

- विवेक भिमनवार, आयुक्त परिवहन विभाग

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसTransferबदलीnagpurनागपूर