नागपूर : फ्रेंडशिप क्लबची मेंबरशिप घेण्यास नकार दिल्यामुळे एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून हप्ता मागितल्या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी हप्तावसुली तसेच आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पावनभूमी येथील ५२ वर्षीय संदीप इंद्रदुसांज खासगी कंपनीत अधिकारी आहे. रविवारी दुपारी संदीप कारने घरी जात होते. दरम्यान त्यांना अज्ञात आरोपीने फोन केला. त्याने संदीपला सांगितले की फ्रेंडशिप क्लब मेंबरशिपसाठी संपर्क केला होता. मात्र संदीपने त्याला नकार दिला. त्याच्या क्लब मेंबरशिपसाठीही नकार दिला. त्या व्यक्तीने विनाकारण आपला वेळ घेतल्याचे सांगून संदीपला बदनाम करण्याची धमकी दिली.
त्या व्यक्तीने संदीपला एक व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठविला. दुसऱ्याच्या फोटोवर संदीपचा चेहरा लावून स्वत:च्या डीपीवर लावला. त्यानंतर ७ हजार रुपये गुगल पे वर ट्रान्सफर करण्यास सांगितले. तसे न केल्यास आपत्तीजनक फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी दिली. संदीपने त्याची सोनेगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हप्तावसुली तसेच आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.