लहुजी शक्ती सेनेची मागणी नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या सूचीत ५९ जाती येतात. यातील काहीच जातींना आरक्षणाचा लाभ झाला आहे. आरक्षणाचा लाभघेऊन एकाच घरात चार-चार लोकांनी नोकऱ्या मिळविल्या आहेत. याच प्रवर्गातील मातंग समाज संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असून, बॅण्ड वाजविणे, झाडू बनविण्याचे काम करीत आहे. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीमध्ये अ.ब.क.ड. नुसार वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात मातंग समाजातील पोटजात असलेल्या मादगी समाजाचे पोतराज पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. एलआयसी पॉईंटवर त्यांना थांबविण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे निवेदनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडल्या. नेतृत्व : डॉ. रूपेश खडसे, विष्णूभाऊ कसबे, सोमनाथ कांबळे, पंकज जाधव, संग्राम करणे, मनोहर तायडे.मागणी : मातंग समाजाला शिक्षणात व नोकरीमध्ये स्वतंत्र आरक्षण मिळावे.अमरावती जिल्ह्यातील गर्ल्स हायस्कूल चौकातील दर्शनीय भागात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्वरित बसवावा. संगमवाडी येथील लहुजी वस्ताद यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद तत्काळ करावी.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला एक हजार कोटीचे बीजभांडवल देऊन त्वरित कर्ज प्रकरण सुरू करावे.
मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या
By admin | Published: December 19, 2015 3:08 AM